R Ashwin becoming 10th player to play 200 IPL matches : आयपीएल २०२४ चा १४ वा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने मैदानात उतरताच एक मोठा पराक्रम आपल्या नावावर केला. त्याचबरोबर तो विराट-धोनीच्या खास क्लबमध्ये सामील झाला.

अश्विनने झळकावलं अनोखं द्विशतक –

आर अश्विन २००९ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने हा सामना खेळण्यापूर्वी १९९ सामने खेळले होते. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामना हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना आहे. यासह रविचंद्रन अश्विनचे ​​नाव आयपीएलमध्ये २०० सामने खेळलेल्या खेळाडूंच्या एलिट यादीत नोंदवले गेले आहे. या यादीत एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

India Women vs New Zealand Women match highlights in marathi
IND W vs NZ W : टीम इंडियाचा सलामीच्या सामन्यात दारुण पराभव, न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे भारताची उडाली भंबेरी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
IND W vs NZ W Run Out Controversy as Umpires Give Dead Ball After Harmanpreet Kaur Runs Amelia Kerr
IND W vs NZ W: भारताबरोबर पहिल्याच सामन्यात झाली चिटिंग, पंचांच्या चुकीमुळे भारताने गमावली विकेट, हरमनप्रीत-कोच भडकले, VIDEO व्हायरल
Morne Morkel Unhappy on Hardik Pandya Bowling
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण
IND vs BAN 1st Test Mohammed sledging to Shanto
IND vs BAN सामन्यात गोंधळ! मोहम्मद सिराज बांगलादेशच्या कर्णधाराशी भिडला, बोट दाखवतानाचा VIDEO व्हायरल
Virat Kohli Naagin Dance Video Viral He Mocks Bangladesh with Snake Pose in IND vs BAN
VIDEO: विराट कोहलीचा फिल्डिंग करतानाचा नागिन डान्स व्हायरल, बांगलादेशला त्यांच्याच स्टाईलमध्ये चिडवलं?
Rohit Sharma Gets Angry on Teammates Stump Mic Video Viral In IND vs BAN
VIDEO: “ओए, सगळेजण झोपलेत का…”, भडकलेल्या रोहितने मैदानात खेळाडूला घातली शिवी, स्टंप माईकमध्ये आवाज रेकॉर्ड
IND vs BAN Virat Kohli ask to Shakib Al Hasan funny question capture stump mic
Virat Kohli : ‘यॉर्करवर यॉर्कर टाकतोयस, तू काय मलिंगा…’, विराटने शकीबला विचारलेला प्रश्न स्टंप माईकमध्ये कैद, VIDEO व्हायरल

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू –

२५३ सामने – एमएस धोनी
२४६ सामने – रोहित शर्मा
२४५ सामने – दिनेश कार्तिक<br>२४० सामने – विराट कोहली
२२९ सामने – रवींद्र जडेजा
२२० सामने – शिखर धवन
२०५ सामने – सुरेश रैना
२०५ सामने – रॉबिन उथप्पा
२०४ सामने – अंबाती रायुडू
२००* सामने – आर अश्विन

हेही वाचा – IPL 2024 : स्पर्धेदरम्यान बीसीसीआयने अचानक बोलावली संघ मालकांची बैठक, महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता

अश्विन आयपीएलमध्ये या संघांसाठी खेळलाय –

आर अश्विनने २००९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. यानंतर तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स, किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. त्याच वेळी, तो आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला. आर अश्विनने आतापर्यंत आयपीएलमधील १९९ सामन्यांत ७.०४ च्या इकॉनॉमीने १७२ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने फलंदाज म्हणून ७४३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे.