चेन्नई सुपर किंग्जचा डावखुरा अष्पपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले. याच कारणामुळे चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझी आणि जाडेजा यांच्यात काही मुद्द्यांवरून बिनसल्याची चर्चा सुरु आहे. असे असताना आता चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी मोठे वक्तव्य केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जाडेजा आयपीएलमधून बाहेर पडला आहे. तो आगामी काळात चेन्नईचा भाग राहील असं त्यांनी म्हटलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> IPL 2022 CSK vs MI : आज मुंबई-चेन्नई आमनेसामने, सीएसकेसमोर आज ‘करो या मरो’

“मी सोशल मीडियावर कोणालाही फॉलो करत नाही. सोशल मीडियावर काय सुरु आहे, याची मला कल्पना नाही. मात्र व्यवस्थापनाच्या बाजूने कोणतीही समस्या नाहीये. सोशल मीडियावरील अॅक्टिव्हीटींबद्दल मला माहिती नाही. जाडेजा आगामी काळात सीएसकेचा भाग राहील, असे काशी विश्वनाथन म्हणाले.

हेही वाचा >> IPL 2022 : रविंद्र जडेजा पाठोपाठ दिल्लीचा सलामीवर पृथ्वी शॉ आयपीएल बाहेर; मुख्य प्रशिक्षकांनी दिली माहिती

त्याचबरोबर “बंगळुरु संघाविरोधातील सामन्यादरम्यान जाडेजाला दुखापत झाली. त्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्सविरोधातील सामन्यात खेळला नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो आगामी सामने खेळू शकणार नाही. याच कारणामुळे तो सध्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे,” असेदेखील विश्वनाथन म्हणाले.

हेही वाचा >> IPL 2022 : दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अश्विनची फटकेबाजी; IPL कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकवत केला विक्रम

दरम्यान, रविंद्र जाडेजासाठी हा हंगाम चांगला राहिला नाही. या मोसमाच्या सुरुवातीलाच महेंद्रसिंह धोनीने चेन्नईचे कर्णधारपद जाडेजाकडे सोपवले. मात्र त्याच्या नेतृत्वात चेन्नई संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर खेळावर परिणाम होऊ नये म्हणून जाडेजाने पुन्हा एकदा संघाचे कर्णधारपद धोनीकडे सोपवले. मात्र हैदरबादविरोधात खेळताना जाडेजाच्या बरड्यांना दुखापत झाली. त्यामुळे आता तो आयपीएलच्या उर्वरित सामन्यांतून बाहेर पडला आहे. चेन्नईने तशी अधिकृत माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra jadeja is been released on medical advice said csk ceo kasi viswanathan prd