Ravindra Jadeja Tweet For MS Dhoni Viral On Social Media : आयपीएलच्या फायनल सामन्यात रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूवर चौकार आणि षटकार ठोकून चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळवून दिला. जडेजाच्या चमकदार कामगिरीमुळं चेन्नईने गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सने पराभव केला. फायनल सामना जिंकल्यानंतर जडेजाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि धोनीसाठी खास मेसेज शेअर केला. जडेजानं ट्वीट करत म्हटलं, माही भाई तुमच्यासाठी तर कायपण, आम्ही फक्त आणि फक्त धोनीसाठी केलं आहे. जडेजाचा हा मेसेज सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या ट्वीटला चाहत्यांनी जबरदस्त रिप्लायही देत आहेत. जडेजाने शेअर केलेल्या फोटोत त्याची पत्नीही दिसत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी धोनी आणि जडेजामध्ये सर्वकाही ठीक नसल्याचं बोललं जात होतं. जडेजाने एक ट्वीट केल्यानंतर लोकांनी तर्क वितर्क लावण्यास सुरुवात केली होती. परंतु, फायनलमध्ये जडेजाने सीएसकेला शेवटच्या चेंडूवर सामना जिंकवून पुन्हा एकदा धोनीचं हृदय जिंकलं. सामना जिंकल्यानंतर धोनीनं जडेजाला मिठी मारून उचलून घेतलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. धोनीनं एखाद्या सामन्यानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारचा जल्लोष केला. याच कारणामुळं जडेजानं धोनीसाठी खास मेसेज करून आयपीएल किताब त्याच्या नावावर केलं.
नक्की वाचा – गुजरातचा संघ जिंकला असता, पण शेवटच्या क्षणी आशिष नेहरा बनला व्हिलन, कसं ते जाणून घ्या
शेवटच्या दोन चेंडूवर चेन्नईला १० धावांची गरज असताना रविंद्र जडेजाने चौकार-षटकार ठोकला आणि चेन्नईनं आयपीएलचा पाचवा किताब जिंकला. धोनी शून्यावर बाद झाल्यानंतर डग आऊटमध्ये गेला आणि शांत बसला. तो कमालीचा भावुक झाला होता. पण जडेजानं चेन्नईला विजय मिळवून दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जडेजाला त्याने मिठी मारून आनंद साजरा केला. तसंच धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा मैदानात भावुक झाली आणि जीवाने धोनीला मिठी मारुन आनंद साजरा केला. धोनीच्या कुटुंबियांचा मैदानातील तो भावुक क्षण कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.