आयपीएलच्या सहाव्या पर्वाच्या रणधुमाळीत हैदराबाद सनरायजर्स विरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात रॉयल चँलेंजर्स बंगळुरूचा विजय थोडक्यात हुकला. आणि हैदराबाद आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला. या पराभवाची भरपाई करण्यासाठी ‘हार का बदला जीत से लेंगे’ असा निर्धार बंगळूरू संघाने केला आहे. उद्या(मंगळवार) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि हैदराबाद सनरायजर्स यांच्यात बंगळुरूमध्ये सामना रंगणार आहे. कोलकाताने देखील या पर्वाची सुरूवात दिल्लीविरुद्धच्या विजयी सामन्याने केली आहे. त्यामुळे कोलकाता विरुद्ध जिंकण्याचेही आव्हान रॉयलचॅलेंजर्स पुढे आहे.
बंगळूर रॉयल चॅलेंजर्स आणि हैदराबाद सनरायजर्स यांच्या दरम्यान राजीव गांधी आंतराष्ट्रीय स्टेडीयमवर झालेला सामना शेवटच्या षटका अखेर अनिर्णित ठरला होता. त्यानंतरच्या सुपर ओव्हरमध्ये सनरायजर्सने थरारक विजय मिळविला आणि बंगळुरुला आपल्या होम ग्राऊंडवर पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे यापुढील सामना जिंकण्याचे बंगळूरुचे लक्ष्य असेल. तर दुस-या बाजूला हैदराबाद सनरायजर्सची आपल्या विजयाची घोडदौड अशीचं सुरू ठेवण्याचा प्रयत्न असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcb aim for revenge against sunrisers hyderabad