RCB record in playoffs : आयपीएलच्या १७ व्या मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारे चारही संघ निश्चित झाले आहेत, ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने आधीच स्थान मिळवले होते. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या साखळी सामन्यात धूळ चारुन प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले. प्लेऑफ्समध्ये पोहोचण्यासाठी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला चेन्नई सुपर किंग्जचा १८ किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने पराभव करायचा होता. मात्र, आरसीबीने सीएसकेचा २७ धावांनी धुव्वा उडवत प्लेऑफ्समध्ये धडक मारली. यासह आता आयपीएलच्या इतिहासात आरसीबीच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या ७ सामन्यांमध्ये १ जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा आरसीबी पहिला संघ –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी लीग टप्प्यातील सामन्यांचा सुरुवातीचा टप्पा खूपच खराब होता, ज्यामध्ये त्यांना पहिल्या ७ सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकता आला होता. यानंतर, आरसीबीने आयपीएल २०२४ च्या उत्तरार्धात शानदार पुनरागमन केले आणि पुढील ७ पैकी ६ सामने जिंकून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. यासह, आरसीबी आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या ७ सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. आरसीबी संघाला आता २२ मे रोजी प्लेऑफमध्ये आपला पुढील सामना खेळायचा आहे, जो एलिमिनेटर सामना असेल आणि तो अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात आरसीबीचा सामना राजस्थान रॉयल्स किंवा सनरायझर्स हैदराबाद संघाशी होऊ शकतो.

प्लेऑफ्समधील आरसीबीची आतापर्यंतची कामगिरी –

आयपीएलच्या इतिहासात नव्यांदा आरसीबी संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. याआधी, जेव्हा संघ ८ वेळा प्लेऑफ्समध्ये पोहोचला आहे, तेव्हा तो केवळ ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचू शकला आहे. या तिन्हींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाच वेळा संघाचा प्रवास प्लेऑफ सामन्यांमध्ये पराभवाने संपला. २०१६ च्या मोसमात आरसीबी संघ शेवटची आयपीएल फायनलमध्ये पोहोचला होता, ज्यामध्ये त्यांना सनरायझर्स हैदराबादकडून ८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

हेही वाचा – VIDEO : यश दयालने आपल्या कमबॅकचे श्रेय ‘या’ खेळाडूला दिले, सिराजशी बोलताना केला खुलासा

शेवटच्या षटकात यश दयालची निर्णायक गोलंदाजी –

पहिल्या चेंडूवर धोनीने फाइन लेगवर जोरदार शॉट खेळला आणि ११० मीटरचा षटकार मारला. आता संघाला पाच चेंडूत ११ धावांची गरज होती, पण पुढच्याच चेंडूवर धोनी स्वप्नील सिंगच्या हाती झेलबाद झाला. यानंतर शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला. तिसऱ्या चेंडूवर एकही धाव आली नाही. आता सीएसके संघाला तीन चेंडूत ११ धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर शार्दुलने थर्ड मॅनच्या दिशेने शॉट खेळला आणि एक धाव घेतली. आता चेन्नईला प्लेऑप्समध्ये पात्र ठरण्यासाठी दोन चेंडूत १० धावांची गरज होती. जडेजा क्रीजवर स्ट्राइकवर होते. दयालने ओव्हरच्या शेवटचे दोन्ही चेंडू डॉट्स टाकले, ज्यामुळे आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcb became the first team to secure a place in the playoffs after winning only 1 in the first 7 matches in ipl history vbm