RCB 6th Successive Win in Away Games of IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीचा संघ उत्कृष्ट फॉर्मात आहे. संघाने सुरूवातीपासून एकापेक्षा एक कमाल कामगिरी करत विजय नोंदवले आहेत. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या आजच्या सामन्यात आरसीबीने महत्त्वपूर्ण विजयाची नोंद केली आहे. या विजयासह आरसीबीने आयपीएल इतिहासातील एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.च
आरसीबीने विराट कोहली आणि कृणाल पंड्याच्या ११९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर दिल्लीवर ६ विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीच्या फलंदाजीसाठी खडतर खेळपट्टीवर सावध आणि संथ सुरूवात करत आरसीबीने १-१ धाव जोडत हा धावांचा डोंगर सर केला आणि विजय नोंदवला. यामध्ये विराट कोहली आणि कृणाल पंड्याची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. तर टीम डेव्हिडने ५ चेंडूत १९ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
आरसीबीचा संघ यंदाच्या मोसमातील १० पैकी ७ सामने जिंकत सर्वाधिक १४ गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. आरसीबीने यंदाच्या मोसमातील ३ सामने हे त्यांच्या घरच्या मैदानावर चिन्नास्वामी स्टेडिमयवर खेळताना गमावले आहेत. तर प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळताना आरसीबीने सलग ६ सामने गमावले आहेत.
आयपीएल इतिहासात प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानावर खेळताना सलग ६ सामने जिंकणारा आरसीबी हा पहिलाच संघ ठरला आहे. सलग सहा सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात रोखायची आरसीबीची किमया दाखवली आहे. आजवरच्या इतिहासात कोणत्याच संघाला ही कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली आणि त्याच्या संपूर्ण संघाने दिल्लीविरूद्धचा सामना जिंकताच हा दुर्मिळ विक्रम आपल्या नावे केला आहे.
आरसीबीने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानावर जिंकलेल्या सामन्यांचा आढावा
केकेआर वि. आरसीबी – ७ विकेट्स आणि २२ चेंडू राखून विजय
सीएसके वि. आरसीबी – ५० धावांनी विजय
एम आय वि. आरसीबी – १२ धावांनी विजय
आरआर वि. आरसीबी – ९ धावा आणि १५ चेंडू राखून विजय
पीबीकेएस वि. आरसीबी – ७ विकेट्स आणि ८ चेंडू राखून विजय
डीसी वि. आरसीबी – ६ विकेट्स आणि ९ चेंडू राखून विजय