Lucknow Super Kings vs Royal Challengers Bangalore, IPL Today Match Updates: आयपीएल २०२३ मधील १५ वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरु येथे होत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेक गमावून आरसीबीने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसकने एक मोठा कारनामा केला आहे. फाफ डू प्लेसिसने एलएसजीविरुद्ध एक धाव घेत आपल्या आयपीएलमधील ३५०० धावा पूर्ण केल्या आहेत.
डू प्लेसिसने १ धाव घेताच ३५०० धावा पूर्ण केल्या –
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आज एक मोठा विक्रम केला आहे. डू प्लेसिसने एक धाव घेत आयपीएलमध्ये त्याच्या ३५०० धावा पूर्ण केल्या आहेत. प्लेसिसने आत्तापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये 296 षटकार मारले आहेत, तर आजच्या सामन्यात ४ षटकार मारल्यास तो टी-२० क्रिकेटमध्ये ३०० षटकार पूर्ण करणारा पहिला खेळाडू बनेल. अशा परिस्थितीत आज आरसीबी चाहत्यांना डु प्लेसिसकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने आरसीबीच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी आरसीबीसाठी दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ९६ धावांची शानदारी भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहली ६१ धावा करुन बाद झाला. त्याने ४४ चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या.
सामन्याबद्दल बोलायचे तर, १६ षटकानंतर आरसीबीने १ बाद १४६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कर्णधार फाफ डू प्लेसिस ५३ आणि ग्लेन मॅक्सवेल २२ धावांवर खेळत आहे. तसेच लखनऊकडून अमित मिश्राने एक विकेट घेतली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, डेव्हिड विली, वेन पारनेल, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), जयदेव उनाडकट, अमित मिश्रा, आवेश खान, मार्क वुड, रवी बिश्नोई.