RCB’s unwanted record : आयपीएलच्या १७ व्या हंगामातील ४५वा सामना अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने विल जॅकच्या शतकाच्या आणि विराटच्या फटकेबीजीच्या जोरावर ९ विकेट्सनी विजय मिळवला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजा करताना आरसीबील २०१ धावांचे दिले होते, जे आरसीबीने १६ षटकातं पूर्ण केले. या दरम्यान आरसीबी संघाच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरसीबीच्या गोलंदाजांने नोंदवला नकोसा विक्रम –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकात ३ गडी गमावून २०० धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासात आरसीबीन संघाने एका डावात २०० किंवा त्याहून अधिक धावा दिल्याची ही २८वी वेळ आहे. यासह, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा २०० किंवा त्याहून अधिक धावा देणाऱ्या संघांच्या यादीत आरसीबी संघ संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा २०० धावा खर्च करणारे संघ –

२८ वेळा – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
२८ वेळा – पंजाब किंग्स
२२ वेळा – दिल्ली कॅपिटल्स<br>२२ वेळा – कोलकाता नाईट रायडर्स
२१ वेळा – चेन्नई सुपर किंग्ज</p>

हेही वाचा – IPL 2024 : विराटच्या स्ट्राईक रेटवर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘जे मॅक्सवेल करू शकतो ते कोहली करू शकत नाही अन्…’

विराटने अर्धशतक तर विलने झळकावले शतक –

आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने या हंगामातील चौथे अर्धशतक ३२ चेंडूत पूर्ण केले. यादरम्यान त्याने ४४ चेंडूत ७० धावांची नाबाद खेळी केली. गुजरातविरुद्ध किंग कोहलीने १५९.०९ च्या स्ट्राईक रेटने सहा चौकार आणि तीन षटकार मारले. यासह विराट कोहलीने आयपीएल २०२४ मध्ये ५०० धावा पूर्ण केल्या. त्याचवेळी विल जॅकनेही अवघ्या ४१ चेंडूत शतक झळकावले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. या दरम्यान त्याने २४३.९० च्या स्ट्राइक रेटने पाच शतके आणि १० षटकार ठोकले. त्याच्या वादळी खेळीमुळे आरसीबीने १६ षटकांत एक गडी गमावून २०६ धावा केल्या आणि सामना नऊ गडी राखून जिंकला.

हेही वाचा – VIDEO : एमएस धोनीच्या IPL मधील यशाचे आणि फिटनेसचे काय आहे गुपित? स्वत: माहीनेच केला खुलासा

साई सुदर्शनची शानदार खेळी –

या सामन्यात गुजरात टायटन्ससाठी साई सुदर्शनने सर्वाधिक धावा केल्या. साई सुदर्शनने ४९ चेंडूत ८४ धावांची नाबाद खेळी खेळली साकारली. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याने १७१.४२ च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या. त्याचवेळी शाहरुख खाननेही ३० चेंडूत ५८ धावांची शानदार खेळी केली. डेव्हिड मिलरने १९ चेंडूत २६ धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcb jointly with pbks became the first team to most times 200s runs conceded in ipl vbm