RCB embarrassing record in IPL: बुधवारी रात्री आयपीएल २०२३ च्या ३६ व्या सामन्यात केकेआर आणि आरसीबी आमनेसामने आले होते. या सामन्यात केकेआरने आरसीबीवर २१ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात आरसीबीने केकेआरविरुद्ध लाजिरवाणा विक्रम नोंदवला. केकेआरविरुद्धच्या या सामन्यात, आरसीबीने आयपीएलमध्ये २४ व्यांदा एका डावात २०० किंवा त्याहून अधिक धावा दिल्या आहेत. यासह, आयपीएल इतिहासात, आरसीबी संघ एका डावात २०० किंवा त्याहून अधिक धावा देणारा संघ ठरला आहे. होय, यापूर्वी हा विक्रम पंजाब किंग्जच्या नावावर होता.
यापूर्वी, आयपीएलमध्ये एका डावात २०० किंवा त्याहून अधिक धावा देण्याचा विक्रम आरसीबी आणि पंजाब किंग्जच्या नावावर होता. दोन्ही संघांनी संयुक्तपणे २३-२३ वेळा असे केले होते. मात्र बुधवारी रात्री कोलकाताविरुद्ध बंगळुरूने हा लज्जास्पद विक्रम आपल्या नावावर केला. या २४ पैकी ११ वेळा आरसीबीने घरच्या मैदानावर २०० किंवा त्याहून अधिक धावा दिल्या आहेत. या यादीत सर्वात तळाशी मुंबई इंडियन्सचा संघ आहे, ज्याने केवळ ११ वेळा असे केले आहे आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक २०० किंवा त्याहून अधिक धावा देणारे संघ –
२४ – रॉयलल चॅलेंजर्स बंगळुरू
२३ – पंजाब किंग्ज<br>१८ – कोलकाता नाइट रायडर्स
१७ – चेन्नई सुपर किंग्ज<br>१६ – दिल्ली कॅपिटल्स
१४ – राजस्थान रॉयल्स
१४ – सनरायझर्स हैदराबाद
११ – मुंबई इंडियन्स
या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर या सामन्यात बंगळुरूला २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीचा या मोसमातील हा चौथा पराभव आहे. विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जेसन रॉयचे अर्धशतक आणि कर्णधार नितीश राणाच्या ४८ धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर कोलकाताने २०० धावा फलकावर लावल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहलीने आरसीबीसाठी ३७ चेंडूत ५४ धावांची खेळी निश्चितच खेळली, मात्र इतर कोणत्याही फलंदाजाची साथ न मिळाल्याने तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या मोसमात केकेआरने दुसऱ्यांदा आरसीबीचा पराभव केला आहे.