सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने आयपीएलच्या १४ व्या हंगामात धडकेबाज कामगिरी केली होती. त्याने १४ व्या हंगामात ३२ विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली होती. त्याच्या या कामगिरीनंतर पटेलचे नशिबच पालटले. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात त्याला बंगळुरुने तब्बल १०.७५ कोटी रुपयात विकत घेतलेले आहे. क्रिकेटमध्ये सध्या तो नावाजलेला चेहरा असला तरी त्याने अगोदर खूप संघर्ष केलेला आहे. त्याच्या खडतर प्रवासाचा एक किस्सा त्याने नुकताच सांगितला आहे. आयपीएलमध्येच लिलावादरम्यान त्याला कसे फसवले गेले होते. त्याचा विश्वासघात कसा झाला, याबद्दल त्याने सविस्तर सांगितलं आहे.

हेही वाचा >> RR vs RCB : रविचंद्रन अश्विनने बंगळुरूला दिले तीन धक्के; आयपीएलमध्ये रचला खास इतिहास

Shreyas Iyer not retained for IPL 2025 by KKR
Shreyas Iyer : ‘श्रेयस अय्यर KKR च्या रिटेन्शन लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर होता, पण…’, केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांचा मोठा खुलासा
Why Kolkata Knight Riders deducted Rs 12 Crore After IPL 2025 Retentions know about
Kolkata Knight Riders : केकेआरला लिलावापूर्वी बसला मोठा…
IPL 2025 Retention Sanju Samson played big role in these RR retentions
IPL 2025 Retention : ‘रिटेन्शनमध्ये संजूची मोठी भूमिका…’, चहल-अश्विन आणि बटलरला रिलीज करण्याबाबत राहुल द्रविड यांचे मोठे वक्तव्य
Virat Kohli should not lead RCB in IPL 2025 Sanjay Manjrekar opposes after IPL 2025 Retention List
Virat Kohli : ‘RCB ने विराट कोहलीला कर्णधार करु नये, कारण…’, IPL 2025 पूर्वी माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य
Sanjeev Goenka LSG Owner Statement After IPL 2025 Retention Said Team wanted to retain players who have mindset to win KL Rahul
IPL 2025 Retention: “ज्या खेळाडूंमध्ये जिंकण्याची मानसिकता…”, रिटेंशननंतर संघमालक संजीव गोयंकांनी केलं मोठं वक्तव्य, केएल राहुलला सुनावलं?
Virat Kohli on IPL 2025 Retention RCB players List
Virat Kohli : ‘मला या संघाबरोबर २० वर्ष…’, RCB ने रिटेन केल्यानंतर विराटने व्यक्त केल्या भावना; म्हणाला, ‘मी इतकी वर्षे…’
IPL 2025 Retention List Team wise retained players Remaining purse and RTMs left for Mega Auction
IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी
IPL 2025 Retention RR released Jos Buttler
IPL 2025 Retention RR : राजस्थानने घेतला मोठा निर्णय, स्फोटक जोस बटलरला डच्चू देत ‘या’ तडाखेबंद खेळाडूला दिले प्राधान्य
Rohit Sharma Statement After Being Retained by Mumbai Indians for less than what Jasprit Bumrah and Hardik Pandya got
Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO

यूट्यूबर गौरव कपूर आपल्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या मुलाखतीच्या कार्यक्रमात क्रिकेटपटूंना बोलतं करतो. याच कार्यक्रमात हर्षल पटेल याने २०१८ सालच्या आयपीएलमध्ये लिलावादरम्यान त्याच्यासोबत काय घडलं होतं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यावेळी जवळपास तीन ते चार फ्रेंचायझींनी आम्ही तुझ्यासाठी बोली लावू असे हर्षल पटेलला सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र दिल्ली कॅपिट्लसव्यतिरिक्त एकाही संघाने त्याच्यासाठी बोली लावली नव्हती.याच प्रकारामुळे हर्षल पटेलला त्याची फसवणूक आणि विश्वासघात केल्यासारखे वाटले. ही माझी फसवणूक होती, असे हर्षल पटेलने या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

हेही वाचा >> “कोहलीने आता ब्रेक घ्यावा, तेच शहाणपणाचं ठरेल,” रवी शास्त्रींचा विराटला सल्ला

आयपीएल २०१८ सालच्या हंगामात दिल्ली संघाने हर्षल पटेलला पाच सामन्यांत खेळण्याची संधी दिली होती. या सामन्यांमध्ये त्याने सात विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर २०१९-२० साली देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला दिल्ली कॅपिट्ल्सने रिटेन केले होते. मात्र २०२० च्या आयपीएल हंगामातही त्याला फक्त पाच सामन्यांमध्ये संधी दिली गेली. त्यानंतर २०२१ च्या आयपीएलमध्ये तो बंगळुरु संघाकडून खेळला. या हंगामात त्याने धडाकेबाज गोलंदाजी केली होती. तरीदेखील बंगळुरु संघाने त्याला रिटेन केले नव्हते. त्यानंतर २०२२ च्या लिलावात बंगळुरु संघाने त्याला तब्बल १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.