Virat Karthik Maxwell and Siraj’s fun bowling session: आयपीएल २०२३ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याबाबत पेचात अडकला आहे, परंतु संघाचे खेळाडू स्वत:ला रिलॅक्स करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट कोहली, दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांनी मजेदार गोलंदाजी सत्रात भाग घेतला. यादरम्यान कोहलीने आपल्या सहकाऱ्यांना तसेच सर्व चाहत्यांना एक ट्विस्ट देऊन आश्चर्यचकित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वास्तविक, गोलंदाजी सत्रात चारही खेळाडूंना गोलंदाजी करत एक लक्ष्य टिपण्यास सांगितले होते, जे काही अंतरावर ठेवण्यात आले होते. दिनेश कार्तिक पहिल्यांदा येतो आणि तीन वेळा गोलंदाजी करतो. चेंडू एकदा स्टँडवर आदळतो तर एकदा तो लक्ष्याच्या बाजूने निघून जातो. हे पाहून बाकीचे खेळाडू चकीत होतात.

यानंतर सिराज गोलंदाजीसाठी येतो. तो पहिल्या चान्समध्ये लक्ष्य टिपण्यास चुकतो, तर दुसऱ्या संधीत सिराज यॉर्कर फेकतो, जो लक्ष्याच्या मुळावर आदळतो आणि स्टँड कोसळतो. हे पाहून कोहली आणि मॅक्सवेलला हसू आवरता येत नाही आणि खूप हसतात. त्यानंतर सिराजने यॉर्कर फेकल्याचे कोहली म्हणतो. यानंतर मॅक्सवेल गोलंदाजीसाठी येतो आणि तिन्ही चेंडू एकत्र फेकतो. कोहली शेवटी येतो, पण गोलंदाजी करण्याऐवजी तो धावत जाऊन लक्ष्याच्या जवळ पोहोचतो आणि अचूक लक्ष्यावर त्याच्या हातातला चेंडू मारतो.

या मजेदार गोलंदाजी सत्राचा व्हिडीओ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनीही जोरदार कमेंट केल्या आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, विराटने विरोधी संघाला शून्यावर ऑलआऊट केले. दुसऱ्या यूजरने लिहिले, ग्रेट विराट. तसेच तिसऱ्या यूजरने लिहिले, असा एक चेंडू गंभीरच्या चेहऱ्यावर मार. आणखी एका यूजरने लिहिले, विराटने पुढच्या सामन्यात गोलंदाजी करावी.

हेही वाचा – Mohammad Siraj: सरप्राईज देण्यासाठी कोहलीसह आरसीबीचे खेळाडू पोहोचले सिराजच्या घरी, VIDEO होतोय व्हायरल

याआधी राजस्थान रॉयल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रविवारी (१४ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आरआरचा ११२ धावांनी पराभव केला. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीने २० षटकात ५ विकेट गमावत १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ १०.३ षटकांत ५९ धावांवर गारद झाला. आयपीएलच्या इतिहासातील हा राजस्थानचा सर्वात मोठा पराभव आहे.