Dinesh Karthik retired from IPL : अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, ज्याची इंडियन आयपीएलमधील महान खेळाडूंमध्ये गणना केली जाते. आरसीबीस संघ १७ व्या सत्रातील एलिमिनेटर सामन्यातून बाहेर पडला. यानंतर दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच कार्तिकने आपल्या वक्तव्यात स्पष्टपणे सांगितले होते की, हा त्याचा आयपीएलमधील शेवटचा हंगाम असेल. राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनरही दिला. आता आरसीबीने दिनेश कार्तिकच्या संदर्भात एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली आणि दीपिका पल्लिकल यांनी कार्तिकबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीपिका पल्लिकल काय म्हणाली?

आरसीबीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिनेशची पत्नी दीपिका म्हणाली, “मला वाटतं जेव्हा ज्या गोष्टी घडायच्या असतात, तेव्हा त्या घडतात. २०१३ मध्ये जेव्हा आम्ही भेटलो होतो, तेव्हा आम्हाला आमचं आयुष्य एकमेकांसोबत घालवायचं होतं. मला वाटतं सगळं काही ठीक चाललंय. एक गोष्ट मी त्याच्याकडून खरोखरच शिकले की ती म्हणजे जेव्हा तो चांगली कामगिरी करत नाही तेव्हा त्याला संघातून वगळले जाते. तो दोन-तीन दिवस शांत होतो आणि मग त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करू लागतो.”

‘मी त्याच्या जागी असती तर मी हार मानली असती’

दीपिका पल्लिकल पुढे म्हणाली, “मला वाटतं त्याच्या जागी दुसरं कुणी असतं तर अनेकांनी खूप आधीच हार मानली असती. मी सुद्धा हार मानली असते. मी एक ॲथलीट आहे, त्याला त्याच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या पदांवर पाहून, त्याच्या जागी मी असते तर मी नक्कीच हार मानली असती. पण मला असे वाटते की त्याच्याकडे नेहमी करो या मरो आणि कधीही हार न मानण्याचीवृत्ती कायम राहिली.”

हेही वाचा – IPL 2024 : विराटची राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर भावनिक पोस्ट; RCB च्या चाहत्यांचे आभार मानत म्हणाला…

‘२००९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मी त्याला पहिल्यांदा भेटलो’

विराट कोहलीनेही दिनेश कार्तिकबद्दल सांगितले की, “मी त्याच्यासोबत मैदानाबाहेर अनेक चांगल्या आणि अप्रतिम चर्चा केल्या आहेत. तो खूप बुद्धिमान व्यक्ती आहे आणि त्याला क्रिकेटशिवाय इतर अनेक गोष्टींची चांगली माहिती आहे. २००९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटलो, तेव्हा तो मला खूप गोंधळलेला आणि हायपरएक्टिव्ह व्यक्ती वाटत होता. त्या काळात मी त्याच्याशी बदलणारे चेंजिग रुम शेअर केली होते, तो सगळीकडे फिरायचा. जेव्हा मी दिनेश कार्तिकला खेळताना पाहतो, तेव्हा तो मला तांत्रिकदृष्ट्या खूप चांगला खेळाडू वाटतो. तुम्ही त्याला कोणतीही भूमिका द्या, तो त्यात पूर्णपणे उतरतो. मी त्याला २०१३ च्या आयपीएल हंगामात खेळताना पाहिले होते, जेव्हा त्याने ६०० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यादरम्यान त्याने अनेक शानदार फटके खेळले होते.”

हेही वाची – T20 WC 2024 : दिनेश कार्तिक IPL निवृत्तीनंतर दिसणार नव्या भूमिकेत, टी-२० विश्वचषकासाठी मिळाली मोठी जबाबदारी

‘माझ्या खराब फॉर्ममध्ये कार्तिकने माझ्याशी संवाद साधला होता’

दिनेश कार्तिकबद्दल विराट कोहली पुढे म्हणाला की, “२०२२ च्या आयपीएल हंगामात जेव्हा मी चांगला खेळत नव्हतो, त्यावेळी कार्तिक माझ्याशी २ ते ३ वेळा चर्चा केली होती. मला प्रामाणिकपणे सांगितले की, त्याने माझ्याबद्दल गोष्टी कशा पाहिल्या. कारण कदाचित मी त्या वेळी गोष्टी चांगल्या प्रकारे पाहू शकत नव्हतो. मला त्याचा प्रामाणिकपणा आणि धैर्य आवडते आणि हेच एक कारण आहे की मी नेहमीच त्याच्यासोबत असतो.” आगामी काळात कार्तिक आरसीबी फ्रँचायझीशी जोडला जाईल, अशी आशाही कोहलीने व्यक्त केली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcb shares video of wife deepika pallikal and virat kohlis reaction to dinesh karthiks ipl retirement vbm