मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लढत चांगलीच अटीतटीची होत आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. दिल्ली संघ पराभूत झाला तरच बंगळुरुला प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकेल. याच कारणामुळे बंगळुरु संघाच्या सर्वच खेळाडूंचे आजच्या सामन्याकडे लक्ष लागले आहे. बंगळुरु संघाचे सर्व खेळाडू आजचा सामना पाहताना दिसत आहेत. तसे काही फोटो बंगळुरु संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेसाठी लवकरच संघाची घोषणा; उमरान मलिक, दिनेश कार्तिक यांना संधी मिळण्याची शक्यता

आजच्या लढतीत दिल्लीचा पराभव किंवा विजयावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे भवितव्य अवलंबून आहे. आजच्या सामन्यात दिल्ली संघांचा विजय झाल्यास तो बंगळुरु संघाशी बरोबरी साधेल. मात्र रनरेट जास्त असल्यामुळे दिल्ली संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल तर बंगळुरु संघाचे आव्हान संपुष्टात येईल. तसेच आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय झाला तर दिल्ली संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होईल आणि बंगळुरु संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळेल.

हेही वाचा >>> पृथ्वी शॉ चांगलाच गोंधळला, जसप्रितच्या बाऊन्सरचा सामना करताना थेट खाली कोसळला; झाला झेलबाद

याच कारणामुळे बंगळुरु संघ मुंबई इंडियन्स संघाला पूर्णपणे पाठिंबा देताना दिसतोय. बंगळुरु संघाचे खेळाडू दिनेश कार्तिक, फॅफ डू प्लेसिस, विराट कोहली यांनी मुंबईला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणाचा विजय होईल हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Story img Loader