Axar Patel Kuldeep Yadav RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ किती अप्रत्याशित आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, त्यांच्या १३२ धावांत ३ विकेट्स होत्या आणि याच स्कोअरवर ३ विकेट्स पडल्या. दिल्ली कॅपिटल्ससाठी अक्षर पटेलने १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षल पटेलची शिकार केली, तर पुढच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर कुलदीप यादवने आणखी दोन विकेट्स घेत बंगळुरूचे कंबरडे मोडले.

१४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुरुवात झाली. अक्षर पटेलच्या फिरकी चेंडूवर हर्षल पटेलची बॅट पायामागे अडून बसली. अंपायरने आऊट न दिल्याने दिल्लीने डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये असे दिसून आले की अभिषेक पोरेलने अप्रतिम झेल घेत आरसीबीला चौथा धक्का दिला. पुढच्याच षटकात डेव्हिड वॉर्नरने कुलदीप यादवकडे चेंडू सोपवला. ३ षटकारांसह १८ धावांवर फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेलने हवाई शॉट खेळला आणि डेव्हिड वॉर्नरने झेल टिपण्यात कोणतीही चूक केली नाही.

Jofra Archer has joined the IPL 2025 mega auction
Jofra Archer : IPL 2025 च्या महालिलावासाठी निवडलेल्या खेळाडूंमध्ये आणखी एकाची एन्ट्री! इंग्लंडच्या ‘या’ धडाकेबाज खेळाडूवर लागू शकते मोठी बोली
IPL 2025 Auction Who is Auctioneer Mallika Sagar Will Host Upcoming Mega Auction
IPL 2025 Auction: आयपीएल लिलावाची सूत्रं कोणाकडे? जाणून…
Mohmamed Shami Instagram Story on Sanjay Manjrekar Gives Befitting Reply on His IPL Auction Price
IPL 2025 Auction: “बाबा जी की जय हो”, IPL लिलावातील किमतीबाबत माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यावर मोहम्मद शमी संतापला, पोस्ट शेअर करत चांगलंच सुनावलं
Mohammad Kaif Says Ricky Ponting did not want Shikhar Dhawan
Mohammad Kaif : सौरव गांगुलीने ‘या’ खेळाडूसाठी पॉन्टिंगशी घातला होता वाद, मोहम्मद कैफचा मोठा खुलासा
Rishabh Pant breaks silence on leaving Delhi Capitals after Sunil Gavaskar statement about Delhi Capitals ahead IPL 2025
Rishabh Pant : ‘पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सला सोडलं नाही…’, IPL 2025 च्या महालिलावापूर्वी ऋषभ पंतच्या पोस्टने खळबळ
IPL 2025 Mega Auction List of most expensive players in each IPL season's auction
IPL 2025 : धोनीपासून ते मिचेल स्टार्कपर्यंत… प्रत्येक हंगामात कोणता खेळाडू ठरला होता सर्वात महागडा? पाहा संपूर्ण यादी
IPL 2025 Mumbais Omkar Salvi roped in as RCB bowling coach
IPL 2025 : RCB चा मोठा निर्णय! संपूर्ण कारकीर्दीत विराटपेक्षा कमी विकेट्स घेणाऱ्याला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून केले नियुक्त
IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण

‘ग्लेन मॅक्सवेल शानदार फलंदाजी करत होता, पण…’

त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळीनंतर कुलदीप यादव म्हणाला की, “ही विकेट थोडी संथ आहे. यामुळे मी चांगली लाईन आणि लेन्थ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विराट कोहलीसमोर मी अनेक वाइड्स टाकले.” याशिवाय कुलदीप यादवने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलच्या फलंदाजीवर भाष्य केले. कुलदीप यादव म्हणाला की, “ग्लेन मॅक्सवेल शानदार फलंदाजी करत होता, पण माझा स्वतःवर विश्वास आहे. यामुळे ग्लेनने मॅक्सवेलला बाद करण्यात यश मिळवले.”

अशा प्रकारे पहिल्याच चेंडूवर अक्षरने विकेट घेतली, कुलदीपच्या षटकातील पहिल्या तर डावाच्या सलग दुसऱ्या चेंडूवर ही संघाची दुसरी विकेट होती. त्यानंतर दिनेश कार्तिक मैदानात आला आणि तो पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात ललित यादवकरवी झेलबाद झाला. अशाप्रकारे कुलदीप यादवने सलग तिसऱ्या चेंडूवर दुसरे आणि दिल्लीला तिसरे यश मिळवून दिले.

येथे, तथापि, हर्षल पटेलला बाद करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला कारण टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू बॅटमधून जाण्यापूर्वी स्निकोमीटरमध्ये हालचाल दिसून आली होती. येथे तिसऱ्या पंचाने आऊट देण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, कुलदीप यादवने या षटकात बाय म्हणून दोन धावा दिल्या होत्या. त्यामुळे बंगळुरू संघाने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १७४ धावा केल्या. संघाकडून सर्वाधिक म्हणजे, विराट कोहलीने ३४ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या, तर कुलदीप आणि मिचेल मार्शने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

हेही वाचा: IPL 2023, RCBvsDC: आधी कर्णधार, मग लामोरला पाठवले तंबूत…; पाहा बंगळुरूविरुद्ध ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा स्वॅग

बंगळुरूने सामना जिंकला

आयपीएलच्या आजच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दिल्ली कॅपिटल्सचा २३ धावांनी पराभव करत स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला. त्याचवेळी दिल्लीला सलग पाचव्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ केवळ १५१ धावा करू शकला आणि सामना २३ धावांनी गमावला.