RCB vs GT IPL 2023 Today Match Weather Report: आयपीएल २०२३चा ७० वा सामना शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. लीग टप्प्यातील हा शेवटचा सामना आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. जिथे गुजरात संघाने प्लेऑफमध्ये जागा निश्चित केली आहे, तिथे बंगळुरूला त्यांचा शेवटचा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यांना पुढील टप्प्यात प्रवेश करता येईल. मात्र, आरसीबीसाठी पाऊस खलनायक ठरू शकतो. सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. सामन्याच्या वेळी हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.

Weather.com नुसार, बंगळुरू विरुद्ध गुजरात सामन्यात पावसाची ६० टक्क्यांहून अधिक शक्यता आहे. सामन्याच्या नियोजित वेळेत पावसाची ७० टक्के शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन तासांत पावसाची ५८ ते ६३ टक्के शक्यता आहे. सामन्यादरम्यान तापमान सुमारे २३°C ते २६°C पर्यंत असू शकते. आर्द्रता अंदाजे ६९% ते ८६% असेल. सध्या ताशी ९ प्रती/ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. सकाळपासून ढगाळ हवामान असून रिमझिम पाऊस देखील झाला आहे.

weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!
Huge displeasure among passengers over ST fare hike Mumbai news
एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी
weather department expressed possibility of increasing heat in Mumbai for next one or two days
मुंबईत उकाडा वाढण्याची शक्यता
Shivaji park dust Mumbai
Shivaji Park Mumbai : एमपीसीबीकडून पुढील आठवड्यात शिवाजी पार्क धुळीचा आढावा
Temperature drop in Mumbai, Temperature ,
मुंबईच्या तापमानात घट

हेही वाचा: Rinku Singh: … स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे! रिंकूची एक चूक अन् कोलकात्याने हातातोंडाशी आलेला घास गमावला

विशेष म्हणजे, प्लेऑफमध्ये तीन संघ फायनल झाले आहेत. गुजरात व्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स देखील पात्र ठरले आहेत. बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अंतिम जागेसाठी लढत होत आहे. दोघांचे सध्या १४-१४ गुण आहेत. पण चांगल्या नेट-रनरेटमुळे आरसीबी चौथ्या आणि मुंबई सहाव्या स्थानावर आहे. आज दुपारी ३.३० वाजता मुंबईचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. मुंबई आणि आरसीबीचा सामना जिंकल्यास नेट-रननेटच्या आधारे निर्णय घेतला जाईल. पण जर मुंबई जिंकली आणि आरसीबीचा सामना पावसाने आटोपला तर एमआय पात्र ठरेल कारण त्यांचे १६ गुण होतील. दुसरीकडे, आरसीबीचे १५ गुण शिल्लक राहतील.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली असून त्यांचा संघ सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाच्या शर्यतीत पुढे आहे. १३ सामन्यांतून १८ गुणांसह गुजरात संघाने साखळी फेरीत पहिले स्थान मिळवले आहे. आरसीबी आणि गुजरात टायटन्स हे दोघेही मोठे विजय नोंदवून या सामन्यात उतरतील. गुजरातने सनरायझर्सवर ३४ धावांनी मात केली, तर आरसीबीने सनरायझर्सवर आठ गडी राखून विजय मिळवला. कोहलीने या सामन्यात शतक झळकावले, जे त्याचे आयपीएलमधील एकूण सहावे शतक होते. कोहली आणि त्याचा सलामीचा जोडीदार डु प्लेसिस यांनी त्या सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि संघ त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करेल. पण गुजरातविरुद्धचा सामना सोपा नसेल, हार्दिकचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे.

हेही वाचा: IPL2023, MS Dhoni: “आँख बंद करके नहीं घुमाएगा”, जडेजाला टिप्स देताना स्टंप माइकमध्ये कैद झाला एम.एस. धोनीचा आवाज

बंगळुरू-गुजरातच्या सामन्यात कशी असेल खेळपट्टी?

बंगळुरूचे मैदान लहान असून शेवटचे सहा सामने घरापासून दूर खेळल्यानंतर आरसीबी अंतिम सामन्यासाठी पुन्हा परतली आहे. अशा परिस्थितीत गुजरातला मोठ्या फरकाने पराभूत करण्याचे आरसीबीसमोर आव्हान आहे. दोन्ही संघांचे फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजी बंगळुरूसाठी कमकुवत दुवा ठरू शकतो. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ हवामान, मैदान आणि खेळपट्टी या तिन्ही बाबतीत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.

Story img Loader