आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६० व्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. बंगळुरु संघ आजचा सामना जिंकून टॉप फोरमध्ये कायम राहण्यासाठी प्रयत्न करेल. तर दुसरीकडे आजच्या सामन्यात बंगळुरुला नमवत प्लेऑफच्या शर्यतीत वरचे स्थान गाठण्यासाठी पंजाब लढत देईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>जाडेजाने IPL सोडल्यानंतर चेन्नईच्या सीईओंनी दिली मोठी माहिती, म्हणाले “तो बाहेर पडला कारण…”

गुणतालिकेचा विचार करायचा झालं तर सध्या बंगळुरु संघाची पंजाब किंग्जपेक्षा चांगली स्थिती आहे. बंगळुरु संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असून या संघाने आतापर्यंत १२ पैकी ७ सामन्यांत विजय मिळवला असून ५ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्ज गुणतालिकेत आठव्या ठिकाणी असून या संघाने ११ पैकी पाच सामन्यांत विजय मिळवला आहे. तर ६ सामन्यांत या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी पंजाबला पुढचे सर्वच सामने जिंकणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>मुंबईच्या विजयामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात; सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लॉमरोर, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज

पंजाब किंग्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, मयंक अग्रवाल (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ऋषी धवन, राहुल चहर, कागिसो रबाडा, इशान पोरेल, अर्शदीप सिंग</p>

हेही वाचा >> शाहरुख खानच्या नाईट रायडर्स ग्रुपचा विस्तार, यूएई टी-२० लीगसाठी खरेदी केला संघ

आजचा सामना कोठे पाहता येईल ?

आजचा सामना स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स 3 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी या चॅनेल्सवर तसेच डिस्ने प्लस हॉटस्टारवरदेखील हा सामना लाईव्ह पाहता येईल. सामन्याला सायंकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcb vs pbks today match playing 11 know who will win prd