RCB special relationship with 23rd April: रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. आयपीएलचा हा ३२वा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आरसीबीने लीगमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. सहापैकी तीन जिंकले आहेत आणि तीन हरले आहेत. पॉइंट टेबलच्या दृष्टीने राजस्थानविरुद्धचा हा सामना बंगळुरूसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना २३ एप्रिल रोजी होणार आहे. ही ती तारीख आहे जिच्याशी आरसीबीचा खास संबंध आहे.

२३ एप्रिलशी आरसीबीचा खास संबंध –

आरसीबीने २३ एप्रिल रोजीच लीगमधील सर्वात मोठी धावसंख्या केली. त्याच तारखेला, दुसर्‍या मोसमात, त्याने लीगमधील सर्वात लहान धावसंख्या केली. अशा स्थितीत ही तारीख त्यांच्यासाठी कधी आनंदाची तर कधी दु:खाची ठरली आहे. संघाचा सामना रविवारी राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. अशा स्थितीत यावेळी आरसीबीच्या नशिबी काय येते हे पाहावे लागेल.

IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?

पुण्याविरुद्ध २६३ धावा केल्या होत्या –

२०२३ मध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना पुणे वॉरियर्सशी झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २६३ धावा केल्या होत्या, जी आजही लीगमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे. या सामन्यात ख्रिस गेलने १७५ धावांची तुफानी खेळी केली, जी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. पुणे संघ या सामन्यात केवळ १३३ धावाच करू शकला होता. त्यामुळे आरसीबीने १३० धावांनी सामना जिंकला.

हेही वाचा – IPL 2023 MI vs PBKS: हिटमॅन रोहित शर्माने आयपीएलमध्ये रचला इतिहास; ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच भारतीय

आरसीबीचा संघ अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता –

लीगमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारल्यानंतर चार वर्षानंतर, आरसीबीने त्याच तारखेला सर्वात लहान धावसंख्याही नोंदवली. २३ एप्रिल २०१७ रोजी आरसीबीचा केकेआरशी सामना झाला होता. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना १३१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीला केवळ ४९ धावा करता आल्या. आरसीबीचा एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही आणि संपूर्ण संघ केवळ ९.४ षटकेच खेळू शकला. आरसीबीने हा सामना ८२ धावांनी गमावला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB): विराट कोहली (कर्णधार), फाफ डुप्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, डेव्हिड विली, वनिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार.

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.