Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore IPL Match Updates:  रविवारी (दि. २३ एप्रिल) आयपीएल २०२३ मध्ये डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) सामने खेळवले जाणार आहेत. दिवसातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. राजस्थान रॉयल्स संघात ३.३० वाजता सुरू झाला. या सामन्यात पुन्हा एकदा आरसीबीचे नेतृत्व विराट कोहली करताना दिसला. दोन वर्षांपूर्वीच कर्णधार म्हणून आपली भूमिका संपवलेल्या विराटला या हंगामात सलग दुसऱ्यांदा चाहते नेतृत्व करताना पाहत आहेत. मात्र, नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस संघात असतानाही विराट का नेतृत्व करत आहे? याबाबत आपण जाणून घेऊया.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातही आरसीबीचे नेतृत्व विराट कोहली करत आहे. या सामन्यात त्यांचा संघ हिरव्या जर्सीमध्ये उतरला आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने राजस्थानसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने नऊ गडी गमावून १८९ धावा केल्या. फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला आरसीबीकडून चांगली खेळी करता आली नाही. या दोघांशिवाय फक्त दिनेश कार्तिक (१६ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. प्लेसिसने ६२ आणि मॅक्सवेलने ७७ धावा केल्या.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
IND vs ENG Aakash Chopra questioned absence of Shivam Dube from India squad for the upcoming T20I series
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

फॅफ व मॅक्सवेल जोडीने राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी तिसऱ्याविकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. या दोघांमुळे बंगळुरूने सामन्यात चांगलेच पुनरागमन केले होते, परंतु हे दोघं मागोमाग तंबूत परतले अन् बंगळुरूच्या अन्य फलंदाजांनी मोठी भागीदारी करता आली नाही. दोनशेचा आकडा पार करणारी धावसंख्या राजस्थानच्या गोलंदाजांनी कसून आणि अचूक टप्पा राखत त्यांना त्याच्या आत रोखले. राजस्थानकडून संदीप शर्मा आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी अश्विन आणि चहलला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

आजच्या सामन्यात विराट कोहली कर्णधार

किंग कोहलीने यापूर्वी झालेल्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात देखील संघाचे नेतृत्व केले होते. विराटने ११ ऑक्टोबर, २०२१ रोजी आरसीबी संघाचे कर्णधारपद सोडले होते. यानंतर त्याने आता ५५६ दिवसांनंतर कर्णधारपदाची धुरा पुन्हा सांभाळलेली. त्याने इतक्या दिवसांच्या कालावधीनंतरही नेतृत्व करताना संघाला मोठा विजय मिळवून दिला होता. विराट नेतृत्व करत असला तरी संघाचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस हा संघात खेळताना दिसतो. चेन्नईविरुद्धच्या सामन्यावेळी प्लेसिसला बरगड्यांची दुखापत झाली होती. त्यामुळे तो पूर्णवेळ क्षेत्ररक्षण करण्यासाठी उपलब्ध नाही. याच कारणाने कर्णधाराची जबाबदारी विराट सांभाळताना दिसतो. फाफ फलंदाजी केल्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार बाहेर जातो. तसेच त्याच्या जागी एका गोलंदाजाला संधी देण्यात येते.

ट्रेंट बोल्टने १०० बळी पूर्ण केले

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने विराट कोहलीला बाद करत आयपीएलमध्ये १०० बळी पूर्ण करण्यासाठी गोल्डन डक मिळवला. या लीगच्या ८४व्या सामन्यात बोल्टने विकेटचे शतक पूर्ण केले. या मोसमात राजस्थानच्या डावाची सुरुवात करताना बोल्टने एकूण ६ षटके टाकली असून ६ विकेट्सही घेतल्या आहेत. या षटकांमध्ये त्याने केवळ १५ धावा दिल्या आहेत आणि त्याची सरासरी २.५ आहे, तर त्याने ३६ डॉट्सपैकी ३२ चेंडू टाकले आहेत.

हेही वाचा: IPL 2023: हिरव्या जर्सीतला विराट कमनशिबीच! तब्बल इतक्या दिवसांनी कर्णधार म्हणून उतरला आणि गोल्डन डकवर माघारी परतला

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), फाफ डुप्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, डेव्हिड विली, वनिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार.

राजस्थान रॉयल्स: जॉस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार / यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.

Story img Loader