Virat Kohli Video Call Anushka Sharma: किंग कोहली अर्थात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं गुरुवारी त्याचा आयपीएलमधील शतकांचा दुष्काळ संपवर धडाकेबाज शतक धळकावलं. अवघ्या ६२ चेंडूंमध्ये विराटनं १०० धावा पूर्ण केल्या आहेत. याबरोबर विराट कोहलीनं ख्रिस गेलच्या आयपीएलमधील सहा शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यामुळे विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत असून त्याच्या चाहत्यांसाठी विराटची ही खेळी अविस्मरणीय अशीच ठरली. मात्र, त्याच्या या खेळीबरोबरच त्याच्या चाहत्यांना विराटनं मैदानावरूनच पत्नी अनुष्का शर्माला लावलेला व्हिडीओ कॉल स्मरणात राहणारा आहे!

नेमकं काय घडलं?

गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा आयपीएलच्या यंदाच्या पर्वातला ६५वा सामना झाला. यामध्ये बंगळुरूनं हैदराबादचा ८ गडी राखून दणदणीत पराभव केला. बंगळुरूच्या विजयामध्ये माजी कर्णधार विराट कोहलीच्या शतकाचा मोठा वाटा होता. विराटच्या या शतकाच्या जोरावर हैदराबादनं दिलेलं १८६ धावांचं आव्हान बंगळुरूनं १९.२ षटकांत अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह बंगळुरूनं टॉप ४ संघात स्थान मिळवलं असून आता प्रत्येक संघाचा एकेक सामना शिल्लक असताना तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी चुरस निर्माण झाली आहे.

Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Check Mohammad Shami Sania Mirza marriage fact check photo
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकले विवाहबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; पण सत्य काय? वाचा
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम

सामना संपल्यानंतर विराटचा अनुष्काला व्हिडीओ कॉल!

दरम्यान, सामना संपल्यानंतर विराट कोहलीनं पत्नी अनुष्का शर्माला मैदानावरूनच व्हिडीओ कॉल केला. विराट अनुष्काशी व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या घटनेचे फोटोही सध्या व्हायरल होत आहेत.

अनुष्का शर्मानंही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर विराटच्या या विक्रमी शतकाबद्दल त्याचं अभिनंदन करणारी पोस्ट केली. “तो धमाका आहे. काय इनिंग होती ती!” असं लिहून अनुष्कानं विराटचे शतकानंतर सेलिब्रेट करतानाचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले.

anushka sharma instagram story
अनुष्का शर्माची इन्स्टाग्राम स्टोरी! (फोटो – एएनआय)

दरम्यान, सामना संपल्यानंतर मैदानावरून हॉटेलवर परत येत असतानाही बसमध्ये विराट कोहली व्हिडीओ कॉलवरच बोलत असल्याचं दिसून आलं. यावेळीही विराट अनुष्काशीच व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचं सांगितलं जात आहे.

विराट आणि अनुष्का अर्थात विरुष्का हे सध्या क्रीडा आणि बॉलिवुडमधल्या सर्वाधिक चर्चेत असणारं दाम्पत्य असल्याचं पाहायला मिळत आहे.

Story img Loader