Ricky Ponting on Rajasthan Royals: जगातील सर्वात प्रसिद्ध लीग आयपीएल २०२३ आजपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई आणि गुजरात यांच्यात होणार आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स देखील यावेळी पूर्ण उत्साहात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि सध्याचे दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने कोणती आयपीएल फ्रँचायझी आयपीएल २०२३ फायनलची प्रबळ दावेदार आहे, याबद्दल सांगितले.

रिकी पाँटिंगने या संघावर विश्वास व्यक्त केला –

आयसीसी रिव्ह्यूच्या ताज्या भागात बोलताना, पाँटिंगला आयपीएल २०२३ च्या अंतिम फेरीत पोहोचणारा, दिल्ली कॅपिटल्स व्यतिरिक्त कोणताही संघ निवडण्यास सांगण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने गुजरात टायटन्सपासून सुरुवात केली. परंतु त्याचे लक्ष २००८ च्या चॅम्पियन राजस्थान रॉयल्सवर होते, जे गेल्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचल्यावर त्यांच्या १४ वर्षांच्या जुन्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या जवळ पोहोचले होते.

गुजरात अप्रतिम होती, पण राजस्थान फायनल खेळेल –

रिकी पाँटिंग म्हणाला की, “स्पष्टपणे गुजरातची गेल्या वर्षी कामगिरी आश्चर्यकारक होती, एक नवीन संघ होता आणि स्पर्धा जिंकण्यास सक्षम होते. गेल्या वर्षीचे इतर अंतिम स्पर्धक, राजस्थान रॉयल्स, माझ्या मते खरोखरच चांगला संघ आहे. गेल्या वर्षी, लिलावानंतर लगेचच त्यांनी जे केले, ते पाहून आम्ही खूप प्रभावित झालो होतो. त्यात (अंतिम फेरीत) ते नक्कीच राहणार आहेत.”

पाँटिंग पुढे म्हणाला, “हा एक कठीण खेळ आहे आणि कोण जिंकणार, हे समजून घेणे कठीण आहे. जो कठीण परिस्थितीत उभा राहतो तो सहसा जास्त वेळा जिंकतो. पण मला वाटतं की राजस्थान इतर कोणत्याही संघांच्या तुलनेत एक चांगला संघ आहे.”

हेही वाचा – IPL 2023 CSK vs GT: धोनीच्या संघात सामील झालेला आकाश सिंग कोण आहे? सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय

राजस्थानचा पहिला सामना २ एप्रिलला होणार –

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स आपला पहिला सामना दोन एप्रिलला खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद संघाशी होणार आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध शनिवारी होणार आहे.

राजस्थान रॉयल्स संघ –

देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, जोस बटलर, केसी करिअप्पा, कुलदीप सेन, कुलदीप यादव, नवदीप सैनी, ओबेद मॅकॉय, संदीप शर्मा, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरोन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युजवेंद्र चहल जो रूट, अब्दुल पीए, आकाश वशिष्ठ, मुरुगन अश्विन, केएम आसिफ, अॅडम झाम्पा, कुणाल राठौर, डोनोवन फरेरा, जेसन होल्डर.

Story img Loader