Ricky Ponting’s reaction to Virat Kohli’s form: विराट कोहलीने चार वर्षांनंतर आयपीएलमध्ये शतक ठोकले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या अनुभवी खेळाडूने गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १०० धावांची इनिंग खेळली. विराटच्या शतकामुळे आरसीबीच नाही तर टीम इंडियालाही खूप आनंद झाला आहे. भारताला ७ जूनपासून इंग्लंडमधील ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. कोहलीच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू रिकी पाँटिंगने चिंता व्यक्त केली. विराट असाच खेळत राहिला तर ऑस्ट्रेलियाला जिंकू देणार नाही, अशी त्याची भावना आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग म्हणतो की, विराट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी सज्ज आहे. पाँटिंगने कोहलीसोबतच्या संभाषणाचा खुलासा केला. आयपीएलच्या साखळी फेरीत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान दोघांमध्ये संभाषण झाले होते.

पाँटिंगने कोहलीशी झालेलल्या भेटीबद्दल सांगितले –

पाँटिंगने सांगितले की, “मी विराटला एक महिन्यापूर्वी भेटलो होतो, जेव्हा आम्ही बंगळुरूमध्ये खेळलो होतो. मी त्याच्याशी त्याच्या फलंदाजी आणि त्याच्या कारकिर्दीबद्दल छान गप्पा मारल्या. त्याने मला सांगितले की त्याला आपला सर्वोत्तम फॉर्म परत आल्यासारखे वाटत आहे.” त्यानंतर पाँटिंगने कोहलीच्या शतकाचा उल्लेख केला आणि म्हणाला, “तो आयपीएलमध्ये खूप चांगला खेळत आहे. मला खात्री आहे की त्याची विकेट अशीच असेल, जी मिळविण्याचा सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू विचार करत असतील.”

हेही वाचा – IPL 2023: “मुंबई इंडियन्सने ‘या’ खेळाडूला एक रुपयाही देऊ नये”, सुनील गावसकरांचं मोठं वक्तव्य

कोहलीच्या फॉर्ममुळे ऑस्ट्रेलियन घाबरले –

दोन वर्षांच्या खराब फॉर्मनंतर कोहली हळूहळू त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतला आहे. कोहलीने गेल्या वर्षी आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून पुनरागमन केले होते. टी-२० विश्वचषकात विराटने पुन्हा चमकदार कामगिरी केली. कोहलीने गेल्या काही महिन्यांत तिन्ही फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या जबरदस्त फॉर्मने ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मनात दहशत निर्माण केली आहे. विराटचा फॉर्म पाहून पाँटिंगला वाटते की, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताची आघाडीची फळी आणि ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज यांच्यात चांगली लढत पाहायला मिळेल.

Story img Loader