Ricky Ponting On Prithvi Shaw : नेट्समध्ये कसून सराव करणाऱ्या पृथ्वी शॉकडून रिकी पॉन्टिंगला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु, दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य कोचला समजलं की, दुसऱ्या संघातील सलामी फलंदाज शॉपेक्षा अप्रतिम कामगिरी करत आहेत. शॉने सहा सामन्यात खराब प्रदर्शन केल्यानंतर बाहेर ठेवण्यात आलं आणि आता त्याचं पुनरागमनाची शक्यता खूपच कमी आहे. पॉंटिंगने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी म्हटलं, मागील १२ आयपीएल सामन्यात (२०२२ चे सामने) पृथ्वी शॉने अर्धशतक ठोकलं नाहीय. दुसऱ्या संघातील अनेक फलंदाज त्याच्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करत आहेत. या आयपीएलमध्ये शॉने ६ सामन्यात ४७ धावा केल्या आहेत.
पॉंटिंगने म्हटलं, फॉर्ममध्ये असल्यावर पृथ्वी मॅच विनर आहे. याच कारणामुळं त्याला संघात ठेवलं होतं. कारण तो फलंदाजी करताना टिकला तर आम्ही सामना जिंकू शकलो असतो. या हंगामात त्याने चांगली कामगिरी केली नाहीय. सहा सामन्यांमध्ये जवळपास ४० धावा केल्या आहेत. अशा कामगिरीमुळं संघाला फायदा होणार नाही. त्याला बाहेर ठेवायचा निर्णय कठीण होता.
परंतु, आम्ही जो संघ निवडला आहे, तो भविष्यातील सामने जिंकेल, अशी आशा आहे.रिकी पॉंटिंगने पुढं म्हटलं, एनसीएमध्ये काही वेळ घालवल्यानंतर तो यावर्षी आयपीएलमध्ये आला. त्याने फिटनेसवर खूप मेहनत घेतली. नेटवर सराव करताना त्याला पाहिल्यावर मला वाटत होतं की, हे वर्ष त्याच्यासाठी मोठं असेल. परंतु, आतापर्यंत असं झालं नाही.