Rinku Singh latest Interview Update : आयपीएल २०२३ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज रिंकू सिंगने रविवारी धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांच्याच भुवया उंचावल्या. शेवटच्या षटकात कोलकाताला सामना जिंकण्यासाठी २९ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी रिंकूने गुजरात टायटन्सच्या यश दयालला पाच चेंडूत पाच षटकार ठोकले आणि कोलकाताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यानंतर संपूर्ण क्रीडा विश्वात रिंकूची चर्च रंगली असून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. अशातच रिंकूने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतील मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
क्रिकेटमध्ये ज्या प्रकारची कामगिरी सुरु आहे, ते पाहून टीम इंडियात संधी मिळेल? असा प्रश्न विचारल्यावर रिंकूनं म्हटलं, सगळं काही चांगलं सुरु आहे. फलंदाजीही चांगल्या प्रकारे होत आहे. टीम इंडियात खेळण्याबाबत मला आशा आहे. टीम इंडियात खेळणं सगळ्याचं स्वप्न असतं. मी आता सध्या फलंदाजीवर पूर्ण लक्ष देत आहे. टीमने फायनल जिंकावं, अशी माझी इच्छा आहे. आयुष्यात ज्यांनी सहकार्य केलं, त्यापैकी कुणाला क्रेडिड देशील? या प्रश्नावर उत्तर देताना रिंकू म्हणाला, खूप माणसं आहेत, ज्यांनी मला सहकार्य केलं. मला सर्वच गोष्टीत सहकार्य केलं आहे. माझा भाऊ, माझे प्रशिक्षक मसूद अमिनी, स्वप्नील सर आणि कुटंबातील इतर सदस्यांनीही सहकार्य केलं.
जेव्हा कुटुंबासोबत राहत होता, तेव्हा साफसफाई करण्याची नोकरी मिळत होती, वडिलांनी सहकार्य केलं नाही, तेव्हा तुला असं वाटलं होतं की एक दिवस इथपर्यंत पोहोचशील? यावर बोलताना रिंकू म्हणाला, मी असं काही विचार केला नव्हता. मी एन्जॉय करण्यासाठी क्रिकेट खेळणं सुरु केलं. आईने सांगितलं होतं की, वडिल जर सहकार्य करत नसतील तर भाऊसोबत नोकरी कर. घरी पैसे येतील. मी मुलाखतीला गेलो तेव्हा मला साफसफाईचं काम करायला सांगितलं होतं, पण मी तेव्हा नकार दिला. त्यानंतर मी आईला सांगितला मी क्रिकेट खेळेल. क्रिकेटवर पूर्ण फोकस करतो आणि मेहनत घेतो. एक दिवस माझ्या मेहनतीचं फळ मला मिळेल. केकेआर टीम आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी खूप सहकार्य केलं आहे.