Rinku Singh Builds 100 Bed Hostel For Poor Children: काही करुन दाखवण्याची हिंमत असेल तर गरिबीने काही फरक पडत नाही. मेहनतीच्या जोरावर एक दिवस यश आणि प्रसिद्धी मिळते. ही गोष्ट आयपीएल २०२३ चा सिक्सर किंग रिंकू सिंगने हे सिद्ध करुन दाखवले. वास्तविक, अलिगढच्या रिंकू सिंगने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध ५ चेंडूत सलग ५ षटकार ठोकून केलेल्या अप्रतिम पराक्रमाची सर्वांनाच कल्पना आहे. आता तो गरीब मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी अलीगढमध्ये वसतिगृह बांधत आहे. अलिगडमधील महुआ खेडा स्टेडियममध्ये हे वसतिगृह बांधले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिंकूच्या भावाच्या म्हणण्यानुसार, हे १०० खाटांचे वसतिगृह लवकरच तयार होईल. रिंकू सिंगचा मोठा भाऊ मुकुल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वसतिगृहात सुमारे १०० विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गरिबीमुळे मागे राहिलेल्या प्रतिभावान मुलांना या वसतिगृहात राहण्यासोबतच क्रिकेटचे प्रशिक्षणही मिळावे, हा रिंकू सिंगचा उद्देश आहे.

रिंकू सिंग स्वत: क्रिकेटचे धडे शिकवणार –

मुकुल सिंग म्हणाले की, रिंकू सिंग अशा गरीब मुलांसाठी वसतिगृह बांधत आहे, ज्यांना क्रिकेटमध्ये त्यांचे भविष्य घडवायचे आहे. परंतु त्यांच्या मार्गात गरिबी येत आहे. एवढेच नाही तर गरीब मुलांना स्वत: रिंकू सिंग प्रशिक्षण देणार आहे. सुमारे एक ते दीड महिन्यात या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. माझ्या भावाने गरिबी सहन केली आहे, असेही सांगितले.

गरीब मुलांच्या वेदना तो समजू शकतो. या कारणास्तव, त्याला गरीब मुलांना प्रशिक्षण देऊन क्रिकेटच्या जगात आपल्या स्थानावर आणायचे आहे. सुमारे १०० मुलांसाठी हे वसतिगृह तयार करण्यात आले आहे. वसतिगृहातील मुलांना प्रशिक्षणासोबतच सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. तसेच आता गरिबी कोणत्याही होतकरू मुलाचा मार्ग रोखणार नाही, असेही सांगितले.

हेही वाचा – IPL 2023 RR vs GT: गुजरातविरुद्धच्या विजयानंतर राजस्थान रॉयल्सकडून शिमरॉन हेटमायरचे जंगी स्वागत, पाहा VIDEO

अलिगढ येथील रिंकूचे बालपणीचे प्रशिक्षक मसुदज-जफर अमिनी म्हणाले, “त्याला नेहमीच तरुण खेळाडूंसाठी वसतिगृह बांधायचे होते. ज्यांच्याकडे त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आर्थिक संसाधने नाहीत. रिंकू आता आर्थिकदृष्ट्या भक्कम असल्याने, त्याने आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले आहे.

वसतिगृहात सर्व सुविधा मोफत उपलब्ध असणार –

प्रशिक्षक पुढे म्हणाले, “तीन महिन्यांपूर्वी रिंकूने त्याच्या संघात सामील होण्यापूर्वी प्रगतीकडे बारकाईने लक्ष ठेवून काम सुरू केले. वसतिगृहात १४ खोल्या असतील आणि प्रत्येकामध्ये चार प्रशिक्षणार्थी राहू शकतील. शेड आणि मंडपही बांधला जात आहे. स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत. देखील बांधले जात आहे. हे प्रशिक्षणार्थीसाठी त्या ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या कॅन्टीनमध्ये जेवण सोय असणार असणार आहे. यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च येणार असून संपूर्ण खर्च रिंकू करणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinku singh is building a 100 bed hostel to provide free cricket training to poor children vbm
Show comments