Five Sixes in an Over in IPL: आयपीएल २०२३ मध्ये रविवारी केकेआरकडून खेळताना २५ वर्षीय फलंदाज रिंकू सिंगने ख्रिस गेलसह आयपीएल रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव कोरले. रिंकूने शेवटच्या ५ चेंडूत ५ षटकार मारत कोलकाताला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. कोलकाताला शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सविरुद्ध विजयासाठी २९ धावा करायच्या होत्या. अशा स्थितीत दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईकवर पोहोचलेल्या रिंकूने धुमाकूळ घातला. त्याने २०व्या षटकांत यश दयालच्या शेवटच्या पाच चेंडूंवर पाच षटकार ठोकत आपल्या संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

आयपीएलच्या विशेष क्लबमध्ये केला प्रवेश –

यासह रिंकूने आयपीएलमध्ये एका षटकात पाच षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे. आयपीएलच्या इतिहासात हा पराक्रम २०१२ मध्ये युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने केला होता. आठ वर्षांनंतर राहुल तेवतियाने शारजाहमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध शेल्डन कॉट्रेलच्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली होती. २०२१ मध्ये रवींद्र जडेजाही एका षटकात पाच षटकार मारून या खास आयपीएल क्लबमध्ये सामील झाला होता. आता रिंकू सिंगनेही या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

Virat Kohli Naagin Dance Video Viral He Mocks Bangladesh with Snake Pose in IND vs BAN
VIDEO: विराट कोहलीचा फिल्डिंग करतानाचा नागिन डान्स व्हायरल, बांगलादेशला त्यांच्याच स्टाईलमध्ये चिडवलं?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Rohit Sharma Became First Captain to Complete 1000 Runs in 2024 IND vs BAN 1st Test
IND vs BAN: रोहित शर्माने चेन्नई कसोटीत केला मोठा पराक्रम; २०२४ मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार
Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
India A Beat India D In Duleep Trophy 2024 Pratham Singh Tilak Varma Score Century Shams Mulani Player of The Match
Duleep Trophy 2024: श्रेयस अय्यरच्या संघाचा दुलीप ट्रॉफीत सलग दुसरा पराभव, शम्स मुलानीच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर इंडिया ए विजयी
Mitchell Starc on Virat Kohli about IND vs AUS Test Series
‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’
AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

हेही वाचा – Rinku Singh: शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सच्या जबड्यातून विजय हिसकावणाऱ्या रिंकू सिंगची संघर्षमय कहाणी, घ्या जाणून

एक वर्षापूर्वीची जुनी चूक सुधारत ७ चेंडूत ४० धावा केल्या –

वर्षभरापूर्वी, रिंकू सिंगने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शेवटच्या षटकात १५ चेंडूत ४० धावांची खेळी केली पण संघाला विजयाचा उंबरठा ओलांडता आला नाही. पण वर्षभरानंतर गुजरातविरुद्ध ती चूक सुधारत रिंकूने २१ चेंडूंत ४८ धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या ७ चेंडूत त्याने ४० धावा (६,४,६,६,६,६,६) करत संघाला विजय मिळवून दिला.

विजयासाठी ६ चेंडूंत २९ धावांची आवश्यकता असताना खेळपट्टीवर उमेश यादव (नाबाद ५) आणि रिंकू ही जोडी एकत्र होती. विजय आवाक्याबाहेर होता. पण, रिंकूने आपला आवाका दाखवून देत सर्वाना अवाक केले. उमेशने पहिल्या चेंडूवर एक धाव काढून रिंकूला खेळायला दिले. रिंकूने त्यानंतर यशच्या पाच चेंडूंवर टोलेबाजी करताना चेंडूला स्टेडियमची सफर घडवून आणली. सलग पाच षटकार ठोकत रिंकूने कोलकाताचा अशक्य वाटणारा विजय साकार केला.