Rinku Singh and Shubman Gill Video: मागील काही दिवसांपासून कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू रिंकू सिंगची बरीच चर्चा होत आहे. वास्तविक, कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी गुजरातविरुद्ध शेवटच्या ५ चेंडूत ५ षटकार मारुन रिंकू सिंगने जवळपास अशक्य ते शक्य करून दाखवले होते. यानंतर रिंकू सिंगचे खूप कौतुक झाले होते. आता या खेळाडूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू सिंग आणि शुबमन गिल इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडिओ चॅट करत आहेत.

रिंकू सिंगने विराट कोहलीची नक्कल केली –

इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडिओ चॅट दरम्यान रिंकू सिंगने विराट कोहलीची स्टाइल कॉपी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर शुबमन गिलला हसू आवरता आले नाही. खरं तर, यादरम्यान रिंकू सिंगने विराट कोहलीच्या हावभाव आणि फलंदाजीच्या शैलीची नक्कल केली, मग काय त्यावर शुबमन गिलला हसू आवरता आलं नाही. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया चाहते सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर रिंकू सिंगची ही शैली चाहत्यांना खूप आवडत आहे.

Virat Kohli poor batting average in 2024
Virat Kohli : विराट कोहलीच्या संपूर्ण कारकिर्दीत जे घडलं नव्हतं, ते २०२४ मध्ये घडलं; नक्की काय झालं? जाणून घ्या
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Virat Kohli Viral Video in IND vs NZ 2nd Test Match at Pune
Virat Kohli : विराट कोहलीने आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात असं काही केलं की… VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli Tim Southee Fighting Video Goes Viral in India New Zealand 2nd Test Pune Watch
IND vs NZ: विराट कोहली आणि टीम साऊदी खरंच एकमेकांशी भांडत होते का? अंपायरसमोरचा ‘तो’ VIDEO व्हायरल
Virat Kohli Trolled after 15th Clean Bowled in his Test career
Virat Kohli : ‘विराट कोहलीने आता इंग्लंडकडून खेळावे…’ फुलटॉसवर त्रिफळाचीत झाल्याने चाहत्यांचा संताप, मीम्स व्हायरल
Virat Kohli worst shot of his career against Mitchell Santner video viral
Virat Kohli : विराट कोहली फुलटॉसवर त्रिफळाचीत; चाहते अवाक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण,VIDEO व्हायरल
India Bowling Morne Markel Tunrs Net Bowler for KL Rahul Ahead of IND vs NZ 2nd Test Said Need To Remind Myself That I Am 40 Watch Video
VIDEO: “मी ४० वर्षांचा झालोय हे कळायला…”, केएल राहुलसाठी बॉलिंग कोच मोर्ने मॉर्कल झाला नेट बॉलर, पाहा काय म्हणाला?
Virat Kohli and Anushka Sharma attended Krishna Das Kirtan Video viral
Virat Kohli : विराट कोहली भारताच्या पराभवानंतर रमला कीर्तनात, पत्नी अनुष्काबरोबरचा VIDEO होतोय व्हायरल

रिंकू सिंगने सलग ५ षटकार मारून केकेआरला विजय मिळवून दिला होता –

उल्लेखनीय आहे की, यापूर्वी रिंकू सिंगने कोलकाता नाईट रायडर्सला संस्मरणीय विजय मिळवून दिला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससमोर गुजरात टायटन्सचा संघ होता. वास्तविक, कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी शेवटच्या 5 चेंडूत २७ धावांची गरज होती, मात्र रिंकू सिंगने हा सलग पाच षटकारत संघाला विजय मिळवून दिला. त्याचवेळी वेगवान गोलंदाज यश दयाल हा गुजरात टायटन्ससाठी शेवटचे षटक टाकत होता.

हेही वाचा – IPL 2023 SRH vs DC: डेव्हिड वार्नरने जिंकली भारतीय चाहत्यांची मनं; थेट भुवनेश्वर कुमारचे धरले पाय, VIDEO व्हायरल

रविवारी चेन्नईने दिलेल्या २३६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खूपच खराब झाली. संघाचे २ धावांवर २ गडी बाद झाले. ७० धावांपर्यंत संघाने ४ विकेट गमावल्या होत्या. यानंतर जेसन रॉय आणि रिंकू सिंग यांनी कोलकाताला सामन्यात पुनरागमन करुन देण्याचा प्रयत्न केला. १५व्या षटकात रॉय बाद झाल्यानंतर रिंकू सिंगला दुसऱ्या टोकाकडून कोणतीही साथ न मिळाल्याने कोलकाता संघ सामन्यात पिछाडीवर गेला. रिंकूने आपले अर्धशतक पूर्ण केले मात्र कोलकात्याने सामना गमावला.