Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Score Today, 20 May 2023: लखनऊ सुपरजायंट्सने शनिवारी आयपीएल २०२३ मधील त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला एका अतिशय रोमांचक सामन्यात एका धावेने पराभूत करून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. रिंकू सिंगच्या आणखी एका धडाकेबाज खेळीने केकेआरला लक्ष्याच्या अगदी जवळ नेले पण दुसऱ्या बाजूने त्यांना कोणत्याही फलंदाजाची साथ मिळू शकली नाही. रिंकूने ३३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ६७ धावा केल्या. लखनऊने प्रथम खेळताना १७६ धावा केल्या होत्या. केकेआरचा संघ केवळ १७५ धावा करू शकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेवटच्या दोन षटकात ४१ धावांची गरज होती

अखेरच्या दोन षटकांत संघाला विजयासाठी ४१ धावांची गरज होती, मात्र रिंकूच्या आक्रमक खेळीनंतरही संघ लक्ष्यापासून एक धाव दूरच राहिला. १९व्या षटकात त्याने नवीन-उल-हकविरुद्ध २० धावा केल्या. अखेरच्या षटकात यश ठाकूरविरुद्ध तो केवळ १९ धावाच करू शकला आणि केकेआर सामना गमावला. केकेआरच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही मन दु:खी झाले आहे. आता या दोन संघांपैकी एकच संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार आहे.

रिंकूने शेवटच्या षटकात चूक केली

शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वैभव अरोरा क्रीझवर होता. त्याने सिंगल घेऊन रिंकूला स्ट्राइक दिली. दुसऱ्या चेंडूवर त्याला एकही धाव करता आली नाही. त्याने ओव्हरचा तिसरा चेंडू लाँग ऑन आणि डीप मिड विकेटच्या दिशेने खेळला, चेंडू खेळाडूपासून खूप दूर होता. येथे त्याला दोन धावा घेण्याची संधी होती पण रिंकू धावला नाही. जरी वैभव रनआउट झाला असता तरी केकेआरला एक धाव मिळाली असती. अशा परिस्थितीत सामना सुपर ओव्हरपर्यंत जाऊ शकला असता. मात्र, येथे आम्ही त्यांना पराभवासाठी जबाबदार धरत नाही. रिंकूच्या जागी दुसरा कोणी फलंदाज असता तर कदाचित केकेआरच्या पराभवाचे अंतर खूप मोठे झाले असते,  रिंकूने ते कमी केले.

हेही वाचा: IPL2023, MS Dhoni: “आँख बंद करके नहीं घुमाएगा”, जडेजाला टिप्स देताना स्टंप माइकमध्ये कैद झाला एम.एस. धोनीचा आवाज

या पराभवानंतर केकेआर संघाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. तसेच, लखनऊने प्ले-ऑफमध्ये एन्ट्री केली. असे असले, तरीही कोलकाताचा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंग हा भलताच चमकला. त्याने १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वादळी फलंदाजी केली. रिंकू सिंगने आयपीएल २०२३ मध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे टीम इंडियामध्ये त्याचा प्रवेश निश्चित होऊ शकतो. संघाला टी२० मध्ये ५ किंवा ६व्या क्रमांकावर असा फलंदाज मिळाला आहे, जो कोणत्याही परिस्थितीत सामना फिरवू शकतो.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinku singh one mistake and kolkata knight riders went out of the completion ipl2023 on which he will regret avw