Rinku Singh Statement on IPL Salary: रिंकू सिंगने आपल्या वादळी फलंदाजीसह गेल्या दोन वर्षांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. IPL 2023 मध्ये सलग ५ चेंडूत ५ षटकार मारून KKR ला विजयाकडे नेल्यानंतर रिंकूने मागे वळून पाहिले नाही. त्याने भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करत आपल्या खेळीची छाप पाडली आहे. रिंकूच्या बॅटने आयपीएल २०२४ मध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. त्याला टी-२० विश्वचषक संघातही राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळाले आहे. यंदा केकेआरने आय़पीएल २०२४चे तिसरे जेतेपद पटकावले, या विजयानंतर रिंकू सिंगचे वक्तव्य चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिंकू सिंगला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मिळणारे मानधन चकित करणारे आहे. केकेआरकडून खेळण्यासाठी त्याला फक्त ५५ लाख रुपये मिळतात. रिंकूला केकेआरने २०२२ च्या लिलावात संघात सहभागी केले. त्यावेळी त्याचे नाव इतके मोठे नव्हते. याच कारणामुळे लिलावात मोठी बोली त्याच्यावर लागली नाही. पण आता रिंकू आता शानदार कामगिरी करताना दिसत आहे पण तरीही त्याचे मानधन मात्र तितकेच आहे. अनेक अनकॅप्ड खेळाडूंना आयपीएलमध्ये लाखोंचे मानधन मिळत आहे.

हेही वाचा – VIDEO: ‘अनन्या पांडे हॉट, सारा अली खान…’, रियान परागची युट्युब सर्च हिस्ट्री Viral, नेमकं काय घडलं?

आयपीएल २०२४ चे विजेतेपद जिंकल्यानंतर रिंकू सिंगला त्याचे मानधन कमी असल्याबद्दल विचारण्यात आले. दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत रिंकू याबद्दल म्हणाला, “५०-५५ लाखही खूप आहेत. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला वाटलेही नव्हते की मी मला इतके मानधन मिळेल. तेव्हा मी लहान होतो, त्यामुळे ५-१० रुपयेही कसे तरी मिळाले पाहिजेत, या विचारात असायचो. आता ५५ लाख रुपये मिळणे खूप आहे. देव जे देतो त्यात आनंदी राहावे. हा माझा विचार आहे. मला असं अजिबात वाटत नाही की मला इतके पैसे मिळाले पाहिजेत. ५५ लाख रुपयातही मी खूप खूश आहे. जेव्हा माझ्याकडे इतकेही पैसे नव्हते तेव्हा मला त्यांची किंमत कळाली.”

हेही वाचा – लुट पुट गया…आंद्रे रसेल आणि अनन्या पांडेचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल,कोच चंद्रकांत पंडितही थिरकले

टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड झाली नाही याबद्दल रिंकू सिंगने वक्तव्य केले तर याबाबत रोहित शर्माशी काय बोलणं झालं याचाही त्याने खुलासा केला. रिंकू म्हणाला, “हो. चांगली कामगिरी करूनही निवड झाली नाही तर कुणालाही थोडं वाईट वाटतचं. मात्र, यावेळी संघ संयोजनामुळे निवड होऊ शकली नाही. काहीही असले तरी जे हातात नाही त्याचा फारसा विचार करू नये. होय, सुरुवातीला मी थोडा काळजीत होतो. पण ठीक आहे जे झालं ते झालं. जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. रोहित शर्माबरोबर काही विशेष बोलणं झालं नाही. फक्त मेहनत करत राहा एवढेच ते म्हणाले. दोन वर्षांनी पुन्हा विश्वचषक होत आहे. जास्त काळजी करण्याची गरज नाही.”

रिंकू सिंग २८ मे रोजी म्हणजेच आज अमेरिकेला रवाना होणार आहे. टी-२० विश्वचषक संघाचा भाग असलेला एकही भारतीय खेळाडू आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला नव्हता. राखीव खेळाडूंमध्येही फक्त रिंकूनेच आयपीएलची फायनल खेळली होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinku singh statement on ipl salary 55 lakhs said i realized the value of money when dont have kkr ipl 2024 bdg