Rishabh Pant – Zaheer Khan Viral Video: दिल्ली कॅपिटल्स संघाचा संपूर्ण डाव संपला, पण ऋषभ पंत शेवटचे दोन चेंडू शिल्लक असताना फलंदाजीला आला. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. या सामन्यात लखनऊचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी आला. मात्र शेवटच्या काही षटकांमध्ये कर्णधार ऋषभ पंत चर्चेत राहिला. यामागचं कारण म्हणजे, या डावात त्याला केवळ शेवटचे २ चेंडू खेळण्याची संधी मिळाली.
एकाना स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून लखनऊ सुपर जायंट्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. लखनऊ सुपर जायंट्सकडून एडन मार्करम आणि मिचेल मार्शने डावाची सुरूवात केली. दोघांनीही संघाला विस्फोटक सुरूवात करुन दिली. डावाच्या सुरूवातीला एडन मार्करमने ३३ चेंडूंचा सामना करत ५२ धावांची खेळी केली.
या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याला साथ देत मिचेल मार्शने ३६ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची खेळी केली. ही जोडी १० षटकं मैदानावर टिकून होती. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर निकोलस पूरन फलंदाजीला आला. पूरनने लागोपाठ २ चौकार मारले, पण त्यानंतर तो बाद होऊन माघारी परतला.
झटपट ३ विकेट्स गेल्यानंतर चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंत फलंदाजीला येणार हे निश्चित होतं. मात्र असं काहीच झालं नाही. चौथ्या क्रमांकावर अब्दुल समद फलंदाजीला आला. समदला अवघ्या २ धावा करता आल्या. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर डेव्हिड मिलर फलंदाजीसाठी आला. मिलर शेवटपर्यंत नाबाद राहिला. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने १५ चेंडूंचा सामना करत १४ धावांची खेळी केली.
मला बॅटिंगला का नाही पाठवलं?
लखनऊकडून आयुष बदोनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. ज्यावेळी आयुष बदोनी आणि डेव्हिड मिलर फलंदाजी करत होते, त्यावेळी ऋषभ पंत डगआऊटमध्ये पॅडअप करून होता. मात्र त्याला जहीर खानने फलंदाजीसाठी पाठवलंच नाही. ऋषभ जहीर खानच्या बाजूला बसून चर्चा करताना दिसून आला. त्याचे हावभाव पाहून वाटत होतं की, तो फलंदाजीला न पाठवल्यामुळे नाराज आहे. तो,मला बॅटिंगला का नाही पाठवलं? असं म्हणतानाही दिसून आला. शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर आयुष बदोनी आऊट झाला आणि ऋषभला फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. शेवटच्या षटकातील पाचवा चेंडू निर्धाव राहिला. तर शेवटच्या चेंडूवर ऋषभ क्लिन बोल्ड झाला.