Top uncapped Indian players in IPL 2024 : आयपीएल हे सुरुवातीपासूनच खेळाडूंसाठी एक माध्यम आहे, जिथे चांगली कामगिरी करून खेळाडू भारतीय संघात प्रवेश करण्यात यशस्वी होतात. दरवर्षी आयपीएलमध्ये असे चमकणारे खेळाडू तयार होतात, जे नंतर भारतीय संघाचे नाव उज्वल करण्याचे काम करतात, ही यादी मोठी आहे. आता आयपीएल २०२४चा हंगाम संपला आहे. आता लवकरच कोणते खेळाडू भारतीय संघात सामील होतात याची प्रतीक्षा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा –

आत्तापर्यंत, भारतीय संघाचे पुढील मिशन टी-२० विश्वचषक २०२४ आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा आधीच करण्यात आली होती. म्हणजेच यामध्ये कोणत्याही नवीन खेळाडूला संधी मिळणे कठीण आहे. मात्र वर्ल्डकपनंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघाची कामगिरी काहीही असली तरी विश्वचषकानंतर भारतीय संघातील अनेक मोठे खेळाडू विश्रांती घेताना दिसतील असे मानले जाते. अशा परिस्थितीत आयपीएलच्या अनकॅप्ड स्टार खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

अभिषेक शर्मा स्टार म्हणून उदयास आला –

ज्या खेळाडूंनी आयपीएलच्या मोसमात सर्वाधिक प्रभाव पाडला आहे आणि ज्यांनी अद्याप भारतीय संघात पदार्पण केले नाही, त्यापैकी पहिले नाव समोर येते ते म्हणजे अभिषेक शर्मा. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या अभिषेक शर्माने फायनलमध्ये चांगली कामगिरी केली नसेल, परंतु संपूर्ण हंगाम त्याच्यासाठी चांगला गेला. संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यातही त्याचा मोठा वाटा होता, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. अभिषेक शर्माने यंदाच्या आयपीएलमध्ये १६ सामने खेळून ४८४ धावा केल्या आहेत. त्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत.

हेही वाचा – “…उसका रथ आज भी श्रीकृष्ण ही चलाते हैं”, KKRला चॅम्पियन बनवल्यानंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया व्हायरल

रियान परागसाठी हा हंगाम दमदार राहिला –

याशिवाय आणखी एका खेळाडूबद्दल बोलायचे झाले तर तो म्हणजे रियान पराग जो राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. रियान पराग गेली अनेक वर्षे राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळत असला तरी हा मोसम त्याच्यासाठी चांगला गेला आहे. राजस्थानने त्याला सलग चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली, जिथे त्याने स्वत:ला सिद्ध केले. त्याने यावर्षी १६ सामने खेळून ५७३ धावा केल्या आहेत. त्याने ४ अर्धशतके झळकावली. त्याची सरासरी ५२.०९ होती, तर त्याच्या बॅटमधून १४९.२१ च्या स्ट्राइक रेटने धावा आल्या. म्हणजेच भारतीय संघासाठी त्याने आधीच आपला दावा मजबूत केला आहे.

हेही वाचा – KKR vs SRH : सचिन तेंडुलकरने केकेआर संघाच्या विजेतेपदाचे श्रेय कोणाला दिले? म्हणाला, “त्यांच्या…”

साई सुदर्शन आणि नितीशकुमार रेड्डी यांनीही केले प्रभावित –

या दोन्ही खेळाडूंबाबत बरीच चर्चा झाली. पण या यादीत आणखी काही खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांची फारशी चर्चा होऊ शकली नाही. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या साई सुदर्शनसाठीही हा मोसम चांगला होता. त्याने १२ सामने खेळून ५२७ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४७.९१ आणि स्ट्राइक रेट १४१.२८ आहे. जर आपण एसआरएचच्या नितीश कुमार रेड्डीबद्दल बोलायचे, तर त्याला इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. तो एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि लवकरच त्यालाही भारतीय संघात खेळण्याची संधी मिळू शकते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riyan abhishek sharma sai sudarshan nitish kumar these five uncapped players will likely be seen playing for team india vbm