आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २३ वा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यात पंजाब किंग्जची सरशी झाली असून मुंबईचा सलग पाचवा पराभव झाला. या सामन्यात मुंबईचा पराभव झालेला असला तरी मुंबईने दिलेली लढत क्रिकेट चाहत्यांच्या चांगलीच स्मरणात राहिली. मुंबईच्या देवाल्ड ब्रेविसने एकापाठोपाठ मारलेले चार षटकार तर खास चर्चेचा विषय ठरले. ब्रेविसची ही तुफानी फलंदाजी पाहून मुंबईचा कर्णधार रोहित शर्मादेखील प्रभावित झाला आहे. त्याने मैदानात येऊन ब्रेविसचे कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> स्लो ओव्हर रेटमुळे रोहित शर्माला २४ लाखांचा दंड, आणखी एक चूक केली तर होऊ शकते ‘ही’ मोठी कारवाई

पंजाबने मुंबईसमोर १९८ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर हा डोंगर सर करण्यासाठी मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन या जोडीने चांगली सुरुवात केली होती. रोहित शर्मा २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र देवाल्ड ब्रेविसने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या २५ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या. त्याने पंजाबचा गोलंदाज राहुल चहरची तर पिसं काढली. राहुल चगहरच्या षटकात ब्रेविसने एक चौकार आणि एकापाठोपाठ चार षटकार ठोकले. त्यामुळे चहरच्या एकाच षटकात मुंबईला २९ धावा मिळाल्या.

हेही वाचा >>> ४, ६, ६, ६, ६…, मुंबईच्या बेबी एबीची तुफानी फलंदाजी, पंजाबचे खेळाडू बघतच राहिले

ब्रेविसच्या याच कामगिरीने प्रभावित होत रोहित शर्माने त्याचे कौतुक केले आहे. रोहित शर्माने मैदानावर येत देवाल्ड ब्रेविसच्या खांद्यावर हात ठेवत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसेच रोहित शर्मा त्याला काही सूचना देतानादेखील दिसला. एवढंच नव्हे तर मास्टर ब्लास्टर म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडूलकरनेदेखील देवाल्ड ब्रेवीवरचे कौतुक केले.

हेही वाचा >>> रोहित शर्माने रचला इतिहास, ‘हा’ विक्रम नोंदवणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

दरम्यान, पंजाबने केलेल्या १९८ धावांचा पठलाग करताना मुंबईची दमछाक झाली. देवाल्ड ब्रेविसने चांगली फलंदाजी केली असली तरी मुंबईचे इतर फलंदाजी अपयशी ठरले. सामना जिंकण्यासाठी १९९ धावा हव्या असताना मुंबई संघ वीस षटकांत १८६ धावा करु शकला. मुंबईचा १२ धावांनी पराभव झाला.