Rohit Sharma Sad After Dismissal in MI vs SRH: मुंबई इंडियन्सने पराभवाची साखळी मोडून अखेरीस मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यात विजय आपल्या नावे केला. सात विकेट्स राखून सूर्यकुमार यादवच्या झंझावाती शतकामुळे मुंबईला यावेळेस विजयाचा आनंद अनुभवता आला. बहुप्रतीक्षित अशा या विजयामुळे एकीकडे संघातील प्रत्येक जण आनंदी असताना रोहित शर्माच्या चेहऱ्यावर मात्र निराशेचे भाव दिसले. ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या रोहित शर्माचा हताश झालेला फोटो सध्या ऑनलाईन व्हायरल होत आहे. टी २० क्रिकेटमध्ये रोहितचा बिघडलेला फॉर्म हेच या निराशेमागे कारण असू शकते असा अंदाज चाहत्यांनी वर्तवलाय. मागील काही सामन्यांमध्ये विशेषतः चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रोहित अगदी स्वस्तात बाद झाला होता. टी २० विश्वचषकाचा संघ जाहीर झालेला असताना निश्चितच रोहित फॉर्ममध्ये नसणं ही चिंतेची बाब आहे, हेच दडपण कालच्या सामन्यात बाद झाल्यावर रोहितच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होतं.

रोहित शर्माच्या चेहऱ्यावरील निराशा

रोहित शर्माने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या सात सामन्यांमध्ये २९७ धावा केल्या आहेत. ज्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४९ आणि CSK विरुद्ध घरच्या मैदानावर नाबाद १०५ धावा केल्या होत्या. पण, त्याच्या पुढील पाच सामन्यांमध्ये, तो केवळ ३४ धावा करू शकला, ज्यामध्ये चारवेळा तर एकल-अंकी धावसंख्येवरच रोहितला तंबूत परतावे लागले होते. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यात सुद्धा रोहित चार धावा करून बाद झाला होता. यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना अर्थात त्याच्याही चेहऱ्यावर नाराजी होतीच. त्यांनतर कॅमेराने जेव्हा त्याला एमआयच्या ड्रेसिंग रूममध्ये झूम करून टिपलं तेव्हा भारतीय कर्णधाराच्या डोळयात दुःख होते.

IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
KL Rahul Odd Dismissal Video Goes Viral He Gets Bowled Out Between his Legs in India vs Australia A
KL Rahul Wicket Video: असं कोण आऊट होतं??? राहुलची विकेट पाहून चक्रावून जाल, नेमका कसा झाला क्लिन बोल्ड, पाहा व्हीडिओ
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Suraj Chavan
गळ्यात हार घातला, पाया पडला, डोक्यावरून हात फिरवत सूरज चव्हाणने रूद्राप्रति ‘अशी’ केली कृतज्ञता व्यक्त; पाहा व्हिडीओ

रोहित शर्माची विकेट

रोहित शर्माची लय हरवली!

दरम्यान, सनरायझर्स विरुद्धच्या सामन्याआधीच आकाश चोप्राने रोहितच्या फॉर्मविषयी चिंता व्यक्त केली होती. रोहितने हंगामाची जोरदार सुरुवात केल्यानंतर त्याची लय गमावली, ज्यामुळे आता T20 विश्वचषकामध्ये त्याची कामगिरी कशी असेल याविषयी सुद्धा चिंता वाटत आहे असं मत चोप्राने व्यक्त केलं होतं.

हे ही वाचा << मुंबई इंडियन्सच्या सामन्यात पुन्हा नाणेफेकीचा वाद पेटला; Video पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले, “सगळं विकत..”

आकाश चोप्राने युट्युबवरील व्हिडिओमध्ये म्हटले की, “मी प्रथम रोहित शर्मावर लक्ष केंद्रित करत आहे कारण शेवटच्या चार सामन्यांमध्ये (राजस्थान, दिल्ली, लखनऊ आणि कोलकाता) त्याची सर्वोच्च धावसंख्या कदाचित ११ आहे.हे चांगलं लक्षण नाही. त्याने चांगली सुरुवात केली होती. टूर्नामेंटमध्ये ३००- ३२५ धावा केल्या होत्या, या मैदानावर शतकही ठोकले होते, परंतु त्यानंतर त्याची लयच हरवली आहे. आता हे असं घडणं परवडणारं नाहीये.”

येत्या आयपीएल सामन्यांमध्ये रोहितला अजून दोन संधी मिळणार आहेत मात्र त्यानंतर भारतीय संघ यूएसला रवाना होईल जिथे त्यांना आयर्लंडविरुद्ध ५ जून ला त्यांचा पहिला सामना खेळायचा आहे.