Rohit Sharma Sad After Dismissal in MI vs SRH: मुंबई इंडियन्सने पराभवाची साखळी मोडून अखेरीस मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यात विजय आपल्या नावे केला. सात विकेट्स राखून सूर्यकुमार यादवच्या झंझावाती शतकामुळे मुंबईला यावेळेस विजयाचा आनंद अनुभवता आला. बहुप्रतीक्षित अशा या विजयामुळे एकीकडे संघातील प्रत्येक जण आनंदी असताना रोहित शर्माच्या चेहऱ्यावर मात्र निराशेचे भाव दिसले. ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या रोहित शर्माचा हताश झालेला फोटो सध्या ऑनलाईन व्हायरल होत आहे. टी २० क्रिकेटमध्ये रोहितचा बिघडलेला फॉर्म हेच या निराशेमागे कारण असू शकते असा अंदाज चाहत्यांनी वर्तवलाय. मागील काही सामन्यांमध्ये विशेषतः चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रोहित अगदी स्वस्तात बाद झाला होता. टी २० विश्वचषकाचा संघ जाहीर झालेला असताना निश्चितच रोहित फॉर्ममध्ये नसणं ही चिंतेची बाब आहे, हेच दडपण कालच्या सामन्यात बाद झाल्यावर रोहितच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा