मुंबई इंडियन्सचा विस्फोटक फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्माने लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले आणि हंगामाचा शेवट चांगला केला. रोहित गेल्या काही सामन्यांमध्ये धावा काढण्यासाठी धडपडत होता. पण या सामन्यातील रोहितच्या फटकेबाजीने त्याचा फॉर्म दाखवून दिला. रोहितने या मोसमातील दुसरे अर्धशतक लखनऊविरुद्ध झळकावले, पण वानखेडेवर उपस्थित प्रेक्षकांनी रोहित बाद झाल्यानंतर ज्या प्रकारे अभिवादन केले. त्यामुळे कदाचित रोहितचा या मुंबई इंडियन्स फ्रँचायझीसाठी हा शेवटचा सामना असावा या चर्चेला अधिक बळ मिळाले.

रोहितचा आयपीएलमधील फॉर्म भारतीय संघासाठीही चिंतेचा विषय बनला होता. कारण भारताला आयपीएलच्या चालू हंगामानंतर अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषकही खेळायचा आहे. पण लखनऊविरूद्धच्या सामन्यातील वादळी खेळीनंतर चाहत्यांची ही चिंता मिटली. या सामन्यात लखनऊने मुंबईसमोर २१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र रोहितने संघाला वेगवान सुरुवात करून दिली. रोहितने ३८ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ६८ धावांची खेळी केली. मात्र,११व्या षटकात फिरकीपटू रवी बिश्नोईने त्याला बाद केले. रोहितला थर्ड मॅनवर उभ्या असलेल्या मोहसीन खानने झेलबाद करत मुंबईच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tharala Tar Mag Maha Episode Promo Out Arjun Propose to sayali
Video: अर्जुनचं ‘ते’ कृत्य पाहून प्रियाला बसला धक्का आता…; पाहा ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी

रोहित शर्माला जागेवर उभं राहून प्रेक्षकांनी केलं अभिवादन

रोहित बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना वानखेडेवर उपस्थित असलेल्या चाहत्यांनी उभे राहून माजी कर्णधाराला अभिवादन केले. रोहित शर्माचा हा फ्रँचायझीसह हा शेवटचा हंगाम आहे अशी चर्चा जोर धरून आहे. मुंबई इंडियन्सने आधीच रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत पंड्याकडे सोपवले आहे. त्याचसोबत आयपीएल २०२५ साठी मेगा लिलावही होणार आहे, रोहितला मुंबईचा संघ यावेळेस रिलीज करू शकतो अशी ही चर्चा आहे. सध्या रोहित शर्माचे वय ३७ वर्षे आहे हे बघता तो किती काळ आयपीएल खेळेल ही देखील विचार करण्यासारखी बाब आहे. आता चाहत्यांच्या या अभिवादनाने याला अधिक दुजोरा मिळाला आहे.

रोहितला या हंगामाच्या सुरुवातीपूर्वीच कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्याच्या जागी हार्दिक पंड्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली. मुंबईने रोहितच्या जागी हार्दिकला कर्णधार बनवले, पण त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईची कामगिरी खूपच निराशाजनक होती. मुंबई संघ १४ सामन्यांत ४ विजय आणि १० पराभवांसह ८ गुण मिळवत तळाशी १०व्या स्थानावर कायम आहे.

मुंबईचा रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय यंदाच्या मोसमात चुकीचा ठरला आणि संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. पाच वेळचा चॅम्पियन संघ या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. ३७ वर्षीय रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले होते. रोहित २०१३ मध्ये संघाचा कर्णधार बनला होता आणि तो या फ्रँचायझीशी बराच काळ जोडलेला आहे. रोहितने मुंबईसाठी सर्वाधिक धावा, सर्वाधिक चौकार, सर्वाधिक षटकार आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक आयपीएलची जेतेपद जिंकली आहेत.