Rohit Sharma gifted special 200 jersey by Sachin Tendulkar : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने हैदराबादच्या मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचला आहे. रोहित शर्मा आज हैदराबादविरुद्ध आयपीएलमधील २०० वा सामना खेळत आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई संघासाठी २०० वा सामना खेळणारा पहिला मुंबई इंडियन्सचा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माला त्याच्या या अनोख्या विक्रमासाठी सचिन तेंडुलकरने खास जर्सी भेट दिली, ज्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
सचिन तेंडुलकरने हिटमॅनला दिली खास जर्सी भेट –
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रोहित शर्माला त्याच्या या अनोख्या विक्रमाच्या स्मरणार्थ खास जर्सी भेट दिली. आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये सचिनने रोहितला एक खास २०० क्रमांची जर्सी दिली आणि २०० वा सामना खेळत असल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. या कामगिरीबद्दल मुंबई इंडियन्सच्या संपूर्ण संघाने टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे अभिनंदन केले.
२०११ मध्ये, रोहितला मुंबई इंडियन्सने ९.२कोटी रुपयांमध्ये त्यांच्या सामील केले होते. त्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले. आयपीएल २०२४ मध्ये रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्यात आले होते. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईला पहिल्या सामन्यात गुजरातकडून पराभव पत्करावा लागला होता.
हेही वाचा – IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा
रोहित शर्मा आयपीएलमध्ये कोणत्याही फ्रँचायजीकडून २०० किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा तिसरा क्रिकेटर बनला आहे. त्याच्या आधी, विराट कोहली (२३९) आणि एमएस धोनी (२२१) यांनी कोणत्याही एका फ्रँचायझीसाठी २०० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक सामने खेळलेले क्रिकेटपटू –
रोहित शर्मा – २०० सामने*
किरॉन पोलार्ड – १८९ सामने
हरभजन सिंग – १३६ सामने
लसिथ मलिंगा – १२२ सामने
जसप्रीत बुमराह – १२१ सामने