Rohit Sharma Wins 19 Man of the Match Awards: आयपीएल २०२३ मध्ये मंगळवारी रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सवर ६ गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयात कर्णधार रोहित शर्मानेही संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार पटकावत महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. त्याचबरोबर एक मोठा कारनामा केला.

रोहितने सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकले –

रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तर महेंद्रसिंग धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत रोहितने धोनीला या बाबतीत मागे टाकले आहे. एमएस धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत १७ वेळा सामनावीराचा किताब पटकावला आहे.

Sourav Ganguly says Rishabh Pant to become All Time Great in Test Cricket
IND vs BAN : गिल-जैस्वाल नव्हे तर ‘हा’ २६ वर्षीय खेळाडू भारताचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज, सौरव गांगुलीचा दावा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Duleep Trophy 2024 Akashdeep Statement on Mohammed Shami Gives Credit to His Advice After Taking 9 Wickets Haul
Duleep Trophy 2024: आकाशदीपला मोहम्मद शमीने दिला होता गुरूमंत्र, दुलीप ट्रॉफीतील सामन्यात ९ विकेट्स घेतल्यानंतर केला खुलासा
ENG vs SL Joe Root sixth highest run scorer in Test cricket
ENG vs SL Test : जो रुटने कुमार संगकाराला मागे टाकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील सहावा खेळाडू
Mohammed Shami on Rohit Sharma and Rahul Dravid
‘मी कोणत्याच विश्वचषकात पहिल्या पसंतीचा खेळाडू नव्हतो…’, मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, मला संघातून…
Preethi Pal Becomes First Indian Woman Athlete who won 2 Medals in Paralympics
Paris Paralympics 2024: पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने सलग दुसरे पदक जिंकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली महिला भारतीय खेळाडू
Ayush badoni played biggest innings of t20 history in DPL 2024
DPL 2024 : आयुष बदोनीने खेळली भारतीय T20 इतिहासातील सर्वात मोठी खेळी, मोडला श्रेयस अय्यरचा विक्रम
Priyansh Arya hitting six consecutive sixes in an over
DPL 2024 : ६,६,६,६,६,६…भारताच्या ‘या’ फलंदाजाने केला युवराजसारखा पराक्रम, विक्रमी शतकासह धावसंख्येचाही विक्रम

सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकणारे भारतीय खेळाडू –

१.रोहित शर्मा – १९ किताब
२.एमएस धोनी – १७ किताब
३.युसूफ पठाण – १६ किताब
४.विराट कोहलीने – १४ किताब
५.सुरेश रैनाने – १४ किताब

हेही वाचा – IPL 2023 MI vs DC: डेव्हिड वॉर्नरच्या संथ खेळीवर भडकला इरफान पठाण; ट्विट करत म्हणाला…

रोहितने दिल्लीविरुद्ध ६५ धावांची खेळी केली –

मंगळवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंजदाजी करताना सर्वबाद १७२ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला १७३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळताना ४५ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६५ धावांची जबरदस्त खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. अखेरच्या षटकात रोहित बाद झाला असला, तरी त्याने आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते.

आयपीएल २०२३ गुणतालिका –

लखनऊ सुपर जायंट्स चार सामन्यांत तीन विजय आणि एका पराभवासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स संघ तीन सामन्यांत दोन विजय आणि एक पराभवानंतर चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सचे प्रत्येकी चार गुण आहेत. दोघेही अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जचेही चार गुण असून ते पाचव्या क्रमांकावर आहे.