आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५१ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये लढत होत आहे. सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने धडाकेबाज सुरुवात केली. ७४ धावा होईपर्यंत गुजरात टायटन्सला मुंबईचा एकाही फलंदाजाला बाद करता आला नाही. दरम्यान, सलामीला आलेल्या रोहित शर्माने तर अवघ्या २८ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर आगळ्यावेगळ्या कामगिरीची नोंद झाली आहे.
हेही वाचा : ज्यांनी जास्त बळी घेतले तेच संघ गुणतालिकेत टॉपमध्ये, जाणून घ्या IPL 2022 मधील वेगळं समीकरण
रोहित शर्माने आजच्या सामन्यात सलामीला येत सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली. त्याने पाच चौकार आणि दोन षटकार लगावत २८ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. त्याच्या या धावसंख्येचा मुंबईला चांगलाच फायदा झाला. त्याने या सामन्यात एकूण दोन षटकार लगावले. हे षटकार लगावताच त्याने एकट्या मुंबई संघाकडून खेळताना २०० षटकार लगावण्याचा विक्रम केलाय. मुंबईकडून खेळताना त्याच्या नावावर आता २०१ षटकार आहेत.
हेही वाचा : Asian Games Postponed: चीनमध्ये करोनाचा कहर, आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलली
दरम्यान, रोहित शर्मासोबत सलामीला आलेल्या इशान किशननेही धडाकेबाज फंलदाजी केली. त्याने २९ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एक षटकार लगावत ४५ धावा केल्या. तर दुसऱ्या विकेटसाठी आलेला सूर्यकुमार यादव मात्र चांगली खेळी करु शकला नाही. १३ धावा करुन तो झेलबाद झाला.
गुजरात टायटन्स संघाचे प्लेइंग इलेव्हन
वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, प्रदीप संगवान, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी
हेही वाचा : वॉर्नर-पॉवेलपुढे हैदराबाद निष्प्रभ!; दिल्लीचा २१ धावांनी विजय; गुणतालिकेत पाचव्या स्थानी
मुंबई इंडियन्स संघाचे प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ