Rohit Sharma Out for Highest Singles Digit Score: आयपीएल २०२३ मधील ५४व्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने आरसीबीचा ६ गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली . त्याच्यामुळेच मुंबईचा संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. मुंबईकडून सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि नेहल वडेरा यांनी शानदार खेळी खेळली. मात्र या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा नेहमी प्रमाणे स्वस्तात परतला. त्यामुळे त्याच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोहितच्या आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच असे घडले –

रोहित शर्मा गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याच्या बॅटमधून धावा येणे कठीण झाले आहे. आयपीएल २०२३ मध्ये ११ सामन्यांत त्याच्या बॅटमधून फक्त १९१ धावा झाल्या आहेत. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तो ८ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. यासह, तो आयपीएलच्या मागील पाच डावांमध्ये एकेरी धावसंख्येवर (सिंगल डिजिट) बाद झाला आहे, जे त्याच्या कारकिर्दीत प्रथमच घडले आहे. याआधी आयपीएल २०१७ मध्ये, तो सलग चार डावात एकेरी धावसंख्येवर बाद झाला होता.

आयपीएल २०२३ मधील रोहित शर्माचे शेवटचे पाच डाव:

२(८)
३(५)
०(३)
०(३)
७(८)

रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक एकेरी धावसंख्येवर (सिंगल डिजिट) बाद होणारा खेळाडू आहे. आयपीएलमध्ये तो ७२ वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. त्याचवेळी, दिनेश कार्तिक ६८ वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. रॉबिन उथप्पा ५७ वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे.

हेही वाचा – MI vs RCB: सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये केला खास कारनामा; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला १६वा भारतीय खेळाडू

रोहित शर्माची आयपीएल कारकीर्द –

रोहित शर्मा २००८ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत २३८ आयपीएल सामन्यांमध्ये एका शतकासह ६०७० धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ४१ अर्धशतकेही केली आहेत. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १२९.८७ आहे. त्याचबरोबर रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियन बनवले आहे.

हेही वाचा – IPL 2023: पंजाबविरुद्धच्या विजयानंतर केकेआरला मोठा फटका! बीसीसीआयने ‘या’ कारणासाठी नितीश राणावर केली कारवाई

सामन्याबद्दल बोलायचे, तर या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १६.३ षटकांत ४ गडी गमावून २०० धावा केल्या आणि सामना सहा गडी राखून जिंकला.