आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला पाच विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्माने बुधवारी सांगितले की, फ्रँचायझीने त्याला वेगळ्या अवतारात दाखवण्याची संधी दिली. आयपीएल २०२३ मध्ये रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार म्हणून १० वर्षे पूर्ण करेल. पाच विजेतेपदांसह तो या स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. स्पर्धेच्या १६व्या आवृत्तीच्या आधी, कर्णधाराने फ्रँचायझीशी त्याच्या दीर्घ प्रवासातील सहवासाबद्दल सांगितले की “प्रवासातील प्रत्येक क्षण अतिशय प्रेमळ होता.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सवरील स्टार स्पोर्ट्स ऑन कार्यक्रमादरम्यान कर्णधारपदाबाबत मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, “२०१३ साली आमच्या संघाचे एकूण ६ सामने खेळून झाले होते. यामधील ३ सामने आम्ही पराभूत झालो होतो, तर ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. सातवा सामना आम्ही खेळणार होतो आणि त्या सामन्यापूर्वीच्या रात्री मला माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की, आम्ही निर्णय घेतलाय आणि उद्याच्या सामन्यात तू कर्णधार असशील. हे ऐकून अचानक मला धक्का बसला. मला वाटलं की हे गंमत करत आहेत.”

रोहित पुढे बोलताना म्हणाला की, “यानंतर मी सकाळी उठल्यावर मला अनेक बदल झालेले जाणवले. माझ सगळं सामना नॉर्मल रूममधून स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यावेळी मला समजलं की, नाही खरंच मी कर्णधार झालोय. यानंतर मी अनिल कुंबळे आणि इतर सपोर्ट स्टाफना भेटायला गेलो. त्यावेळी त्यांनी मला स्वतःहून विचारलं की, तू सांग तुला कशी टीम हवी आहे? सहसा असं होताना दिसत नाही. तेव्हा मला कळलं की केवळ नावासाठी मला कर्णधार बनवण्यात आलेलं नाही. मी काही नामधारी कर्णधार नाही तर माझ्या मताचाही विचार केला जातो, असा खुलासा रोहित शर्माने केला आहे.”  कर्णधार रोहित शर्माच्या सांगण्यानुसार, “रिकी पॉटिंगच्या निर्णयानंतर ते या सामन्यात खेळणार नव्हते. त्यामुळे आम्ही टीममध्ये काहीसे बदल केले. यानंतर कोलकात्यात झालेला तो सामना आम्ही जिंकला.”

रोहित शर्मा नंबर एक होण्यापासून फक्त १० धावा दूर

अरुण जेटली स्टेडियमवर रोहित शर्माच्या कर्णधार असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने चमकदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यात रोहितने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने ६५ धावा केल्या. या अर्धशतकासह रोहितने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. आयपीएलमधील कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितला नंबर १ बनण्यासाठी फक्त १० धावांची गरज आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन सध्या अव्वल स्थानावर आहे.

हेही वाचा: IPL 2023: “माफ कर धोनी.. याला चाहते २०४० पर्यंत…”, लखनऊविरुद्धच्या खराब यष्टीरक्षणामुळे दिनेश कार्तिकवर नेटिझन्स भडकले

आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

शिखर धवन विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – १०२९ धावा

रोहित शर्मा विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – १०२० धावा

डेव्हिड वॉर्नर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – १०१८ धावा

डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पंजाब किंग्ज – १००५ धावा विराट कोहली विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – ९७९ धावा

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma im just a nominal captain rohit sharma made a big statement about the mumbai indians team in ipl avw