Hardik Pandya vs Rohit Sharma Video: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आणखी एक पराभव पत्करावा लागल्याने संघाच्या एकूणच कामगिरीवर प्रश्न केले जात आहेत. या हंगामाच्या सुरुवातीपासूनच हार्दिक पंड्याकंदील कर्णधारपद वादाचा मुद्दा ठरलं होतं. चाहत्यांकडून वारंवार रोहित शर्मालाच पुन्हा कर्णधार केलं जावं अशी मागणी होत असताना काहीवेळा खेळाडूंच्या वागणुकीत सुद्धा हाच आग्रह दिसून येतो हे मान्य करायला हवं. अलीकडेच पंजाब किंग्स विरुद्ध सामन्यात जेव्हा आकाश मढवालने हार्दिक समोर असतानाही गोलंदाजीची रोहितचा सल्ला घेतला तेव्हा सुद्धा मुंबई इंडियन्सची दुहेरी कॅप्टन्सी चर्चेत आली होती. हार्दिक हा संघाचा नामधारी कर्णधार आहे आणि अनेकदा रोहितच मैदान सेट करताना, खेळाडूंना समजावताना दिसून येतोय, अशा ही गप्पा चाहत्यांमध्ये होत आहेत. याच एकूण स्थितीवर भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने बोल्ड विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इरफानने मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यातील प्री-फायनल ओव्हरचा संदर्भ देत म्हटले की, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मढवाल रोहितच्या सल्ल्याकडे अधिक लक्ष देताना दिसत होता तर हार्दिक तिथे उभा राहूनही फक्त निरीक्षकासारखा दिसत होता.

याविषयी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समधील सामन्यादरम्यान इरफानने दावा केला की मढवाल अजूनही रोहितला कर्णधार म्हणून पाहतो, हार्दिकला नाही, हीच मूळ समस्या आहे, जी संघाने लवकरात लवकर सोडवायला हवी. आकाश, रोहित, हार्दिक तिघे तिथे होते, स्थिती निश्चितच तणावाची होती त्यावेळी आकाश फक्त रोहितकडे बघत होता. फिल्डिंग कशी लावावी, कसा बॉल टाकावा याविषयी त्यांच्यात चर्चा चालू होती. रोहित शर्माच्या सल्ल्यावरच खेळाडूंचा विश्वास आहे आणि यातून हेच समजतं की अजूनही “रोहितच माझा कर्णधार आहे, दुसरं कुणी नाही”ही भावना संघात आहे. मला वाटतं की हार्दिक पंड्या सुद्धा ही जबाबदारी सांभाळायला सक्षम आहे.

हे ही वाचा<< रोहित शर्मा व यशस्वीचा Video पाहून मराठी प्रेक्षक भावुक; ‘हे’ शब्द ऐकून म्हणाले, “भावा मन जिंकलंस”, तुम्हीही बघा

दरम्यान, मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यातील महत्त्वाचे क्षण सांगायचे झाल्यास, काल तिलक वर्मा आणि निहाल वढेरा यांनी संघाला १८० धावांपर्यंत पोहोचवले होते. पण, संजू सॅमसनच्या संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना अथक प्रयत्न केले आणि ८ चेंडू शिल्लक असताना यशस्वी जैस्वालच्या शतकाच्या बळावर दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभूत केले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma is my captain not other guy hardik pandya irfan pathan shares problem behind mumbai indians players mentality mi vs rr svs