Rohit Sharma overtook Shikhar Dhawan to become the highest run-scorer: आयपीएल २०२३ च्या २२ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (एमआय) आणि कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) यांच्यात सामना झाला. मुंबईने कोलकाताचा पाच गडी राखून पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. त्याचवेळी कोलकाताला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने १८५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १४ चेंडू बाकी असताना पाच विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यात रोहित शर्माने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा पोटदुखीमुळे नाणेफेकीसाठी आला नाही. त्यांच्या जागी सुर्यकुमार यादव यांनी नेतृत्व केले. मुंबईला १६८ धावांचे लक्ष्य मिळाले, त्यानंतर रोहित प्रभावशाली खेळाडू म्हणून फलंदाजीला आला. केकेआरविरुद्ध रोहितने छोटी खेळी खेळली, पण या दरम्यान त्याने एक मोठा विक्रम मोडला. रोहितने १३ चेंडूंचा सामना केल्यानंतर २० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत एक चौकार आणि दोन षटकार मारले.
एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू –
रोहित आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत तो शिखर धवनला मागे टाकून नंबर वन बनला आहे. रोहितने केकेआरविरुद्ध १०४० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर धवनने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (सीएसके) १०२९ धावा केल्या. या दोघांनंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर या यादीत आहे. वॉर्नरने केकेआरविरुद्ध १०१८ तर पंजाब किंग्ज (पीबीकेएस) विरुद्ध १००५ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – IPL 2023, GT vs RR: संजूने राशिद खानच्या षटकात पाडला षटकारांचा पाऊस! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
एमआय आणि केकेआर सामन्याबद्दल बोलताना, रोहित आणि इशान किशनने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६५ धावा जोडल्या. पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहितचा डाव समाप्त झाला. त्याला सुयश शर्माने उमेश यादवच्या हाती झेलबाद केले. यानंतर इशानने सूर्यकुमारसोबत दुसऱ्या विकेटसाठी २२ धावांची भागीदारी केली. आठव्या षटकात इशान वरुण चक्रवर्तीचा बळी ठरला. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो झेलबाद झाला.