Lucknow Super Giants vs Mumbai Indians Highlights in Marathi: आयपीएल २०२४ च्या ४८ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात मुंबईने शेवटपर्यंत कडवी झुंज दिली पण संघाला विजय मिळवता आला नाही. आजचा सामना मुंबई इंडियन्ससाठी खास होता, कारण संघाचा यशस्वी माजी कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवस होता. हा सामना जिंकत मुंबईचा संघ रोहितला वाढदिवसाचं गिफ्ट देऊ शकला असता, पण संघ अपयशी ठरला. यासोबतच रोहितने याही वेळेस त्याच्या वाढदिवशी गेल्या काही वर्षांपासून चालत आलेला नकोसा विक्रम कायम ठेवला आहे.
३० एप्रिलला भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा वाढदिवस होता. या मोठ्या प्रसंगी चाहत्यांना बर्थडे बॉयकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण रोहित शर्मा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या दिवशी मोठी खेळी खेळू शकला नाही. आयपीएलमध्ये वाढदिवसाच्या दिवशीचा त्याचा विक्रमही फारसा चांगला नाही.
लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या रोहितकडून वाढदिवसानिमित्त मोठ्या खेळीची सर्वांना अपेक्षा होती. मात्र रोहित केवळ ४ धावा करून बाद झाला. मोहसीन खानने त्याला झेलबाद केले. मात्र, जेव्हा-जेव्हा रोहित शर्मा त्याच्या वाढदिवशी आयपीएलमध्ये खेळला आहे. त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली आहे.
रोहित शर्माने याआधी ४ वेळा वाढदिवसादिवशी सामना खेळला आहे. त्याने २००९ मध्ये त्याच्या वाढदिवशी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १७ धावा केल्या होत्या. २०१४ मध्ये हैदराबाद विरुद्ध १ धाव घेत बाद झाला होता. रोहितने त्याच्या वाढदिवशी २०२२ मध्ये राजस्थानविरुद्ध २ आणि नंतर २०२३ मध्ये राजस्थानविरुद्ध अवघ्या ३ धावा केल्या होत्या.
हेही वाचा- IPL 2024: लखनऊकडून अर्शीन कुलकर्णीचे आयपीएलमध्ये पदार्पण, पण हा मराठमोळा खेळाडू आहे तरी कोण?
रोहित शर्माची वाढदिवसादिवशी आयपीएलमधील कामगिरी
१७ धावा विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, २००९
१ धाव विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१४
२ धावा विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०२२
३ धावा विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०२३
४ धावा विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, २०२४