मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने ६८ धावांची शानदार खेळी केली. गेल्या काही सामन्यांमध्ये रोहितची बॅट शांत होती. पण या सामन्यात मात्र रोहितच्या बॅटमधून वादळी खेळी पाहायला मिळाली पण मुंबईने १८ धावांनी मात्र सामना गमावला. या सामन्यापूर्वी वानखेडेवरील रोहित शर्माचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो कॅमेरामॅनला होत जोडून ऑडिओ बंद करण्याची विनंती करत आहे. पण नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊया.

काही दिवसांपूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा त्याचा जुना मित्र अभिषेक नायरशी बोलत होता. नायर केकेआरच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहे. केकेआरने रोहित आणि नायर बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हार्दिकच्या आगमनानंतर मुंबई इंडियन्समध्ये होणाऱ्या बदलांबद्दल रोहित बोलत होता. त्यानंतर केकेआरने व्हिडिओ डिलीट केला पण तोपर्यंत हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्या व्हीडिओमधील रोहितची वक्तव्य आताही काही सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”

रोहित शर्माचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यापूर्वीचा आहे. यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा त्याचा आणखी एक खास मित्र धवल कुलकर्णीशी बोलत होता. तेवढ्यात कॅमेरामॅन त्यांच हे बोलणं शूट करत होता. रोहितने हे पाहिले आणि तो हात जोडून म्हणाला, ‘भाई, ऑडिओ बंद कर. एका ऑडिओने तर माझी आधीच वाट लावली आहे.’ यावर धवल कुलकर्णी आणि त्यांचा अजून एक मित्र हसत होते. यानंतर कॅमेरामॅनने तो व्हीडिओ बंद केला.

IPL 2024 च्या सुरूवातीच्या सामन्यांमध्ये रोहित शर्माने चांगली फलंदाजी केली. एकदा तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसरा होता. मात्र त्यानंतर रोहितच्या बॅटमधून धावा येणे थांबले. मात्र, अपयशानंतर मोसमातील शेवटच्या सामन्यात रोहितची बॅट चांगलीच तळपली. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने झटपट अर्धशतक झळकावले. त्याने ३८ चेंडूत २० चौकार आणि ३ षटकारांसह ६८ धावांची खेळी खेळली. ज्यामुळे मुंबईला चांगली सुरूवात करून देता आली पण नंतर मात्र इतर फलंदाजांची योग्य साथ न मिळाल्याने संघाला पराभव पत्करावा लागला. लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम खेळताना २१४ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात चांगली सुरुवात करूनही मुंबई संघाला केवळ १९६ धावा करता आल्या. यासह मुंबईचा आयपीएल २०२४ मध्ये शेवटच्या स्थानी कायम आहे.

Story img Loader