DC vs MI IPL 2024: दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीचे फलंदाज चांगल्याच फॉर्मात दिसले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २५७ धावांचा डोंगर उभारत आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सने ऐतिहासिक धावसंख्या रचली. यानंतर दिल्लीने दिलेल्या २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रोहित पहिल्या षटकात मैदानावर होता.यादरम्यान अचानक एक पतंग मैदानात आला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्मा-ऋषभ पंतचा पतंग उडवतानाचा व्हीडीओ

मुंबईच्या फलंदाजीदरम्यान रोहित शर्मा आणि इशान किशन क्रीजवर फलंदाजी करत होते. तेव्हाच मैदानात एक पतंग उडत रोहितजवळ आला. रोहितने तो पतंग यष्टीच्या मागे असलेल्या ऋषभ पंतकडे दिला. रोहित पंतला पतंग देताना काहीतरी सांगतानाही दिसला. पंतने पतंग घेताच अगदी लहान मुलाप्रमाणे तो लाइव्ह सामन्यातच उडवताना दिसला. यानंतर स्क्वेअर लेग पंचांनी तो पतंग पंतकडून घेतला. या घटनेचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

ऋषभ पंत मोठी धावसंख्या उभारू शकला नसला चांगल्या फॉर्मात दिसला. मुंबई इंडियन्सविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १९ चेंडूंमध्ये १५२.६३ च्या स्ट्राइक रेटने २९ धावा केल्या. दरम्यान, त्याच्या बॅटमधून २ चौकार आणि २ षटकार लगावले. शेवटच्या क्षणी झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंत जसप्रीत बुमराहकडून झेलबाद झाला. त्याचा शानदार झेल माजी कर्णधार रोहित शर्माने सीमारेषेजवळ टिपला. बुमराहने बाद झाल्यानंतर त्याची पाट थोपटत प्रशंसा केली. बुमराहने आयपीएलमध्ये सातव्यांदा ऋषभ पंतला बाद केले आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma rishabh pant kite viral video in dc vs mi match ipl 2024 bdg