Rohit Sharma Reveals About Pant Dhawan : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने कॉमेडियन कपिल शर्मासोबत केलेल्या संभाषणात अशा खेळाडूंची नावे सांगितली आहेत, ज्यांच्यासोबत त्याला रूम शेअर करायला आवडत नाही. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर कपिल शर्माच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते, जिथे त्यांनी अनेक गुपिते उघड केली. कपिलसोबतच्या संभाषणादरम्यान रोहित शर्माने गंमतीने सांगितले की, तो पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत यांच्यासोबत रूम शेअर करू इच्छित नाही. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याचे सामान रुममध्ये सर्वत्र अस्ता व्यस्त पडलेले असते. कर्णधार रोहित शर्माने धवन आणि पंतसह लॉकर रूम शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कपिल शर्माशी बोलत असताना रोहितने गंमतीने सांगितले की, तो धवन आणि पंत यांच्यासोबत कधीही रुम शेअर करणार नाही. तो म्हणाला की ते गलिच्छ आहेत आणि तीन-चार दिवस त्यांच्या रुम साफ करत नाहीत. रोहित सध्या आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. यानंतर तो जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

रोहित शर्मा म्हणाला, “आजकाल प्रत्येकाला एक रुम मिळते. पण जर मला एकच रुम शेअर करायची संधी मिळाली, तर दोन लोक असे आहेत, ज्यांच्यासोबत मला रूम शेअर करायला आवडणार नाही. ते म्हणजे शिखर धवन आणि ऋषभ पंत. ते दोघेही खूप गचाळ आहेत. सरावानंतर त्यांनी आपले कपडे बेडवर पसरवलेले असतात.”

हेही वाचा – MI vs DC : मुंबई इंडियन्सने उघडले विजयाचे खाते, दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी उडवला धुव्वा

हिटमॅन पुढे म्हणाला, “त्यांची रुम नेहमी बंद असते. कारण ते दुपारी एक वाजेपर्यंत झोपतात. हाऊसकीपिंग कर्मचारी सकाळी येतात आणि त्यांच्या खोल्या स्वच्छ करतात, त्यामुळे त्यांच्या खोलींच्या दरवाज्यांवर डीएनडी (डू नॉट डिस्टर्ब) लिहलने त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. अन्यथा, ते आत घुसतील. त्यामुळे त्यांच्या रुम अनेकदा तीन-चार दिवस अस्वच्छ असतात. हे त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी त्रासाचे कारण बनते. त्यामुळे मला त्यांच्यासोबत राहता येईल असे वाटत नाही.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma said shikhar dhawan and rishabh pant keep their room very dirty so i dont want to share a room with them vbm