Rohit Sharma Statement On Two Young Players Of Mumbai Indians : आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपदावर शिक्कामोर्तब करणाऱ्या मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करून प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला आहे. सुरुवात थोडी खराब झाल्यानंतर मुंबईने शेवटच्या टप्प्यात काही सामने जिंकून गुणतालिकेत चौथं स्थान गाठलं. मुंबईने १४ सामन्यांपैकी ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला. गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव केल्यानं मुंबईचा प्ले ऑफच्या सामन्यांसाठी क्वालिफाय झाली. लखनऊ सुपर जायंट्सविरोधात होणाऱ्या सामन्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने दोन युवा खेळाडूंबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोहित माध्यमांशी बोलताना म्हणाला, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये दोन नवख्या खेळाडूंनी कमाल केली आहे. तिलक वर्मा आणि नेहल वढेरा हे दोघेही पुढील काही वर्षांमध्ये मुंबई इंडियन्सच नाही तर टीम इंडियासाठीही स्टार खेळाडू बनतील. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, हार्दिक पांड्या आणि जसप्रित बुमराहसोबत असंच काहिसं घडलं आणि आता तिलक आणि नेहलसोबतही अशाचप्रकारच्या गोष्टी घडतील, अशी आशा आहे. पुढचे दोन वर्षे पाहिल्यानंतर लोक म्हणतील, अरे ही तर सुपरस्टार टीम आहे. नेहल आणि तिलक दोघेही खूप चांगले खेळाडू आहेत. भविष्यात दोघेही महान मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियासाठी महान खेळाडू बनतील.”

नक्की वाचा – “तोच रुबाब आणि तोच घमंड…”, CSK आयपीएलच्या फायनलमध्ये दहाव्यांदा पोहोचली, इरफान पठानने शेअर केला खास Video

इथे पाहा व्हिडीओ

तिलक वर्माने २०२२ मध्ये १४ सामन्यांमध्ये ३९७ धावा केल्या होत्या. तर यंदाच्या हंगामात त्याने ९ सामन्यांमध्ये २७४ धावा केल्या आहेत. वर्माने ४५.६७ च्या सरासरीनं आणि १५८.३८ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे नेहल वढेराने याच आयपीएल हंगामात १२ सामन्यांमध्ये २१४ धावा केल्या आहेत. नेहलने ३०.५७ च्या सरासरीनं आणि १४१.७२ च्या स्ट्राईक रेटनं या धावा कुटल्या आहेत.