‘एक्सक्लुसिव्ह कंटेंट, व्ह्यूज आणि एंगेजमेंट याच्या नादात तुम्ही क्रिकेटपटू आणि चाहते यांच्यातला विश्वास तोडत आहात’, अशा शब्दात भारताचा कर्णधार आणि आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा आधारस्तंभ रोहित शर्माने प्रक्षेपणकर्ती कंपनी स्टार स्पोर्ट्सला धारेवर धरलं आहे. एका सोशल मीडिया पोस्टद्वारे रोहितने परखड शब्दात टीका केली आहे.

रोहितने लिहिलं आहे, ‘खेळाडूंच्या आयुष्यातल्या खाजगी गोष्टी जाहीर केल्या जात आहेत. कॅमेरे तुमचं प्रत्येक बोलणं, हावभाव, कृती टिपते आहे. तुम्ही मित्रांबरोबर, घरच्यांबरोबर, संघातील सहकाऱ्यांबरोबर, सरावावेळी जे जे बोलता ते सगळं टिपलं जात आहे. मी बोलत असताना रेकॉर्ड करू नका अशी विनंती करुनही स्टार स्पोर्ट्सने चित्रीकरण केलं. नुसतं चित्रीकरण करुन थांबले नाहीत तर ते प्रसारितही केलं. हा गोपनीयतेचा भंग आहे’.

PM Narendra Modi and Manmohan singh
Dr. Manmohan Singh Passed away: डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
itin gadkari on Secularism word meaning
Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, “संविधानातील सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर…”

त्याने पुढे लिहिलं, ‘त्यांना एक्सक्लुसिव्ह कंटेंट हवं आहे. व्ह्यूज हवे आहेत, एंगजेमेंट हवी आहे. पण या सगळ्याच्या नादात तुम्ही चाहते, खेळाडू आणि क्रिकेट यांच्यातला विश्वासाचा धागा तोडत आहात’.

आशा आहे की भविष्यात परिस्थिती सुधारेल असं रोहितने शेवटी म्हटलं आहे.

रोहितच्या पोस्टला मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळाले असून, कमेंट्समध्येही लोकांनी त्याच्या बोलण्याला पाठिंबा दिला आहे.

केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर हे रोहित शर्माचे मित्र आहेत. मुंबई आणि कोलकाता सामन्याआधी या दोघांदरम्यान झालेलं संभाषण रेकॉर्ड करण्यात आलं होतं. त्यांच्यातला खाजगी संवाद कॅमेऱ्याने टिपला. त्यावरून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असे तर्कही लढवण्यात आले.

काही दिवसांपूर्वी रोहित त्याचा जुना मित्र धवल कुलकर्णी आणि सहकाऱ्यांशी बोलत होता. त्याहीवेळा त्याने हात जोडून विनंती केली की रेकॉर्ड करू नका. त्यानंतरही व्हीडिओ रेकॉर्ड करण्यात आला आणि दाखवण्यातही आला.

मुंबई इंडियन्स संघाने हंगामाआधी हार्दिक पंड्याला ताफ्यात समाविष्ट केलं आणि अनपेक्षितपणे कर्णधारपदी नेमण्याचा निर्णय घेतला. रोहितच्या नेतृत्वात ५ जेतेपदं मुंबई इंडियन्स संघाने पटकावली होती. रोहितला अशा पद्धतीने बाजूला करणं चाहत्यांना रुचलं नाही. हार्दिक पंड्याला प्रचंड प्रमाणावर प्रत्यक्ष आणि ऑनलाईन रोषाला सामोरं जावं लागलं. मुंबईची कामगिरीही यथातथाच राहिली. मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानी राहिला.

पुढच्या हंगामाआधी मेगा ऑक्शन होणार असून रोहित शर्मा अन्य संघाकडून खेळण्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

Story img Loader