Rohit Sharma Statement After Mumbai Indians Match: मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२४ चा हंगाम खूपच निराशाजनक होता. १४ सामन्यांपैकी मुंबईला फक्त ४ सामन्यांतच विजय मिळवता आला आणि संघ ८ गुणांसह गुणतालिकेत तळाशी आहे. अखेरच्या सामन्यातही पंड्याच्या नेतृत्त्वाखालील संघाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात रोहित शर्माने झटपट ६७ धावांची खेळी केली पण संघाला मात्र विजय मिळवून देता आला नाही. या अखेरच्या सामन्यानंतर अखेरीस रोहितने संघाची कामगिरी आणि त्याच्या फलंदाजीवर मौन सोडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फलंदाज म्हणून, “मला माहित आहे की मी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही. पण इतकी वर्षे खेळण्याचा अनुभवानंतर मला माहित आहे की जर मी खूप विचार केला तर चांगले खेळू शकणार नाही. मी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो. सराव करत राहून माझ्या खेळातील चुका सुधारणं हे माझ्या हातात आहे.”

रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं कारण

यानंतर मुंबई इंडियन्सच्या आयपीएल २०२४मधील कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला, “आमचा हंगाम योजनेनुसार गेला नाही आणि त्यासाठी आम्ही स्वतःच जबाबदार आहोत कारण आम्ही खूप चुका केल्या. जे सामने जिंकता आले असते ते आम्ही गमावले. पण आयपीएलमध्ये तुम्हाला कमी संधी मिळतात आणि जेव्हा या संधी मिळतात त्यांच सोनं करायला पाहिजे.”

हेही वाचा – IPL 2024: रोहित शर्मा MI साठी खेळला अखेरचा सामना? बाद झाल्यानंतर वानखेडेवर प्रेक्षकांनी केलं अनोख अभिवादन, VIDEO

भारतीय कर्णधाराने असेही सांगितले की २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी ७० टक्के संघ आयपीएलपूर्वीच ठरविण्यात आला होता. तो म्हणाला, “आयपीएलमध्ये कामगिरीत चढ-उतार येत राहतात. आम्ही त्यावर जास्त लक्ष केंद्रित केले नाही. या आयपीएल हंगामापूर्वीच विश्वचषक संघातील ७० टक्के खेळाडूंना त्यांच्या भूमिका माहीत होत्या.” भारत ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

मार्क बाउचरने लखनऊच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरीचा आढावा घेतला आणि त्यानंतर रोहितसोबत चर्चा केली. रोहितसोबत तर्चा करताना त्याच्या उत्तराने बाऊचरची बोलतीच बंद झाली. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहितसोबतच्या चर्चेबद्दल मार्क बाऊचरनेसांगितले की, ‘मी रोहित शर्माशी बोललो. आम्ही या वर्षीच्या हंगामाचा आढावा घेतला. यानंतर मी त्याला विचारले पुढे काय? रोहित म्हणाला वर्ल्डकप.’ रोहितचे हे उत्तर ऐकल्यानंतर मार्क बाउचर पुढे काही बोलू शकला नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma statement on his batting performance and mumbai indians poor show in ipl 2024 bdg
Show comments