आयपीएलचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामातून बाहेर होणारा पहिला संघ ठरला. यंदाच्या हंगामात संघाची कामगिरी फारच सुमार दर्जाची राहिली आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबई संघ व्यवस्थापनाने संघाचा कर्णधार बदलण्याचा मोठा निर्णय घेतला, ज्याचा त्यांना संपूर्ण हंगामात फटका बसला. मुंबई इंडियन्सच्या संघात फूट पडल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू होती, अनेक दिग्गजांनी यावर आपली मते मांडली होती. पण संघाचा कर्णधार बदलल्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत.

आयपीएल सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले होते, तेव्हापासून चाहते हार्दिकवर टीका करत आहेत. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स कॅम्पची दोन गटात विभागणी झाल्याचेही काही रिपोर्टमध्ये समोर आले आहे. त्याचवेळी, दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, केकेआरविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला सराव सत्रादरम्यान रोहित फलंदाजीचा सराव करत होता, त्यावेळी हार्दिक पंड्या उपस्थित नव्हता. त्याचवेळी हार्दिक सरावासाठी आला असता रोहित आणि सूर्या त्याला टाळून मैदानाच्या बाहेर गेले. रोहित आणि सूर्याशिवाय तिलक वर्माही त्यांच्यासोबत होता. अशा परिस्थितीत रोहित आणि हार्दिक यांच्यातील मतभेदाचे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
pune bjp fight
पुणे: प्रचार फेरीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, संगमवाडीतील घटना
Supriya Sule On Mahayuti
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “भाजपमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतभेद, फडणवीस एक सांगतात तर…”, सुप्रिया सुळेंची खोचक टिप्पणी!
Indian Cricket Team Creates History Becomes First Team To Score 5 T20I International Century in 2024 IND vs SA Tilak Varma
IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?

हेही वाचा – IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?

दुसरीकडे, केकेआरच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आला होता. ज्यामध्ये रोहित शर्माने अशा काही गोष्टींचा उल्लेख केला की ज्या ऐकल्यानंतर चाहत्यांना समजले आहे की रोहित आणि मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं आहे. रोहित केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी बोलत होता आणि समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रोहित सांगताना दिसत आहे की एकेक गोष्ट बदलत आहे, हे मी बांधलेलं मंदिर आहे. पण मला पर्वा नाही, हे माझं शेवटचं आहे.

मुंबई इंडियन्सची कामगिरी यंदाच्या मोसमात खूपच खराब होती. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक फॉलो केला जाणारा संघ या स्पर्धेत बाहेर होणारा सर्वात पहिला संघ ठरला. अजून संघाचा फक्त एक सामना बाकी असताना, मुंबईचा संघ आठ गुणांवर पोहोचला आहे आणि ९व्या स्थानावर आहे. मुंबईला घरचे मैदान सोडून इतर मैदानांवर खेळताना फक्त एकाच सामन्यात विजय मिळवला आला आहे.

हेही वाचा – IPL 2024: हार्दिक पंड्या भर मैदानात बुमराहवर ओरडला, निराश झालेल्या जसप्रीतने दिली अशी प्रतिक्रिया; Video व्हायरल

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील या मुद्द्याशिवाय टी-२० विश्वचषक २०२४ संबंधित संघनिवडीवर एक अहवाल समोर आला आहे. रोहित आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना हार्दिक टी-२० विश्वचषक संघात नको होता, पण बीसीसीआयच्या दबावामुळे हार्दिकची टीममध्ये निवड करण्यात आल्याच या अहवालात समोर आलं आहे. त्याचवेळी, टी-२० विश्वचषकानंतर कदाचित रोहित टी-२० फॉरमॅटला अलविदा करणार असल्याचेही समोर आले आहे.