मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२४ मध्ये विजयाचे खाते उघडले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २९ धावांनी सामना जिंकला. टी-२० क्रिकेटमधील मुंबई इंडियन्सचा हा १५०वा विजय आहे. मुंबई इंडियन्सपूर्वी टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाने १५० सामने जिंकले नव्हते. याचसोबत रोहित शर्माने या सामन्यात मोठी कामगिरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएलमधील गेल्या काही हंगामात रोहित शर्माची बॅट शांत असली तरी रोहितचा टी-२० क्रिकेटमधील रेकॉर्ड नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे. रोहित शर्मा या फॉरमॅटमध्ये पहिलं शतक झळकावणारा भारतीय खेळाडू आहे. आता यासह रोहित २५० टी-२० सामने जिंकणारा पहिला भारतीय बनला आहे.

रोहित शर्मा २५० टी-२० सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना हा रोहित शर्माचा टी-२० क्रिकेटमधील ४३०वा सामना होता. दिल्लीविरुद्धच्या विजयासह रोहितने आपल्या टी-२० कारकिर्दीतील २५०वा सामना जिंकला आहे.यासह रोहित शर्मा २५० टी२० सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. या यादीत एमएस धोनी दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने २२२ सामने जिंकले आहेत.

हेही वाचा: IPL 2024: मुंबई इंडियन्सने रचले विक्रमांचे इमले

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात रोहितने २७ चेंडूंचा सामना करत ४९ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि तीन षटकार लगावले. यासह त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आपल्या १००० धावा पूर्ण केल्या. रोहितशिवाय फक्त विराट कोहली दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १००० धावा पूर्ण करण्याची कामगिरी करू शकला आहे. रोहित शर्माने दिल्लीच्या झाय रिचर्डसनचा झेल टिपताच त्याच्या आयपीएल कारकिर्दितील १०० झेल टिपण्याचा आकडा गाठला आहे. विराट कोहली (११० झेल), सुरेश रैना (१०९ झेल), किरॉन पोलार्ड (१०३ झेल) हे खेळाडू अनुक्रमे या यादीचा भाग आहेत, तर रोहित चौथ्या स्थानावर आहे.

रोहित शर्माने दिल्ली विरूद्धच्या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये केलेले विक्रम
१. रोहित शर्मा २५० टी-२० सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
२. रोहितने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध १००० धावांचा टप्पा गाठला.
३. रोहित आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला. (४९ षटकार)
४. रोहितने आयपीएलमध्ये १०० झेल टिपण्याचा आकडा गाठला.

२००७ मध्ये रोहितने मुंबईकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने ४३० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या संघाने २५० सामने जिंकले आहेत. रोहितने २००७ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध भारताकडून पदार्पण केले होते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma t20 records first indian player to be a part of 250 wins in twenty20 format bdg